Business Idea: घरी राहून महिन्याला कमवायचे 1 लाख रुपये तर हा आहे अगदी सोपा मार्ग, वाचा संपूर्ण माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea:  सध्या देशाची स्थिती पाहिली तर दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या आणि त्यामानाने दरवर्षी नोकऱ्यांची होणारी उपलब्धता यांचे प्रमाण पाहिले तर ते पूर्णपणे व्यस्त आहे. त्यामुळे साहजिकच सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असून  बेरोजगारी हा एक भारतीय अर्थव्यवस्थेपुढील ज्वलंत असा प्रश्न आहे. त्यामुळे नोकरी ऐवजी एखाद्या छोट्या मोठ्या व्यवसायाची सुरुवात करून जर अभ्यास पूर्ण रीतीने व्यवसाय चालवला तर नक्कीच यश मिळतेच व जीवनात देखील आर्थिक समृद्धी येते.

या अनुषंगाने जर आपण व्यवसायांचा विचार केला तर अनेक छोटे व्यवसाय देखील असे आहेत की ज्यामध्ये कमीत कमी गुंतवणूक करून देखील तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नफा कमवू शकतात. परंतु याकरिता तुमच्या व्यवसायाला किंवा तुम्ही बनवत असलेल्या उत्पादनाला बाजारपेठेमध्ये मागणी कितपत आहे यावर सगळे गणित अवलंबून आहे.

यानंतर तुम्ही तुमच्या उत्पादनाचे किंवा व्यवसायाचे मार्केटिंग कशा पद्धतीने करतात हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. या बाबी ज्याला जमल्या तो व्यवसायामध्ये नक्कीच यशस्वी होतो. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता जीवनामध्ये छोटे-मोठे व्यवसाय उभारून ते यशस्वी करण्यातच हित आहे. त्यामुळे घरी बसून कमीत कमी गुंतवणूक करून चांगला आर्थिक परतावा देणाऱ्या व्यवसायांची निवड करणे गरजेचे आहे. अशाच काही व्यवसायांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत जे तुम्हाला घरी बसून महिन्याकाठी लाख रुपये कमावण्याची संधी देतात.

 कमीत कमी गुंतवणुकीत चांगला आर्थिक नफा देणारे व्यवसाय

1- दुधाचा व्यवसाय ग्रामीण भागापासून तर अगदी शहरी भागापर्यंत हा व्यवसाय अगदी उत्तम पद्धतीने चालणारा व्यवसाय असून या माध्यमातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकतात. ग्रामीण भागात म्हणजे गावात देखील हा व्यवसायाची गरज असून तुम्ही पशुपालन व्यवसाय करत नसाल तरीदेखील तुम्ही दुसऱ्या एखाद्या ठिकाणाहून दूध आणून ते घरी बसून विकू शकतात. अशा प्रकारच्या दूध विक्रीतुन देखील तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

2- प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसाय जर आपण प्रॉपर्टी व्यवसायाचा विचार केला तर हा देशातील नंबर वन चा व्यवसाय आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याकरिता तुम्हाला थोडेसे बाहेर फिरणे गरजेचे असून ज्या व्यक्तीला किंवा जमीन मालकाला त्याची जमीन किंवा मालमत्ता विकायचे आहे अशा व्यक्तीला भेटणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक ठराविक दराने यामध्ये बोलायचे असते.

त्यानंतर तुम्हाला किती नफा यामधून मिळणार आहे याचा देखील विचार करावा लागतो आणि मग तुम्ही ती जमीन आणि त्या जमिनीच्या विक्री बद्दलची इतर सर्व माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून चांगल्या भावात एखाद्या व्यक्तीला विकू शकतात. अशा व्यवसायातून तुम्हाला कमिशन चांगल्या प्रकारे मिळते. या व्यवहारामध्ये जमीन खरेदी करणारा आणि विक्री करणारा या दोन्हीकडून कमिशन दिले जाते. त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या व्यवसायातून देखील चांगला नफा मिळतो.

3- शेअर मार्केट ट्रेडिंग व्यवसाय सध्या शेअर मार्केट ट्रेडिंगने चांगला ट्रेंड पकडला असून अनेक सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी व व्यावसायिक स्वतःचे पैसे म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार इत्यादी ठिकाणी गुंतवतात. त्यामुळे या व्यवसायात जर तुम्हाला देखील लोकांच्या माध्यमातून चांगला नफा मिळवायचा असेल तर ते करण्यासाठी अगोदर तुम्हाला स्वतःचे डिमॅट अकाउंट उघडणे गरजेचे आहे या कंपनीचे ब्रोकर होणे गरजेचे  आहे. त्यानंतर तुम्हाला क्लाइंटच्या माध्यमातून फायदा होतो. कारण सध्या परिस्थितीमध्ये या व्यवसायाने खूप जोर पकडला असून या  माध्यमातून देखील तुम्ही चांगला व्यवसाय उभारू शकतात.