Combine Harvester Subsidy : कम्बाईन हार्वेस्टर खरेदी करा आणि सरकारकडून 11 लाख रुपये अनुदान मिळवा! वाचा योजनेची संपूर्ण माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Combine Harvester Subsidy:- कृषी यांत्रिकीकरण हा कृषी क्षेत्राचा आता अविभाज्य भाग झाला असून शेतीची पूर्व मशागती पासून तर पिकांची लागवड, पिकांचे अंतर मशागत तर पिकांची काढणी ते मळणी व एवढेच नाही तर तयार शेतीमाल बाजारपेठेत विक्रीला नेण्यासाठी देखील शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर करताना आपल्याला दिसून येत आहेत.

याच कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्याकरिता शासनाच्या माध्यमातून कृषी यंत्रांवर अनुदान देण्यासाठीची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी उपकरणांच्या खरेदीवर अनुदान दिले जाते.

या योजनांमध्ये कृषी यांत्रिकीकरणावर सबमिशन योजना ही एक महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून पिकांच्या काढणी तसेच मळणी, पिक गोळा करणे व धान्याचे साफसफाईची कामे एकाच वेळी करता येतील असे महत्त्वाचे असलेल्या कम्बाईन हार्वेस्टरच्या खरेदीवर देखील आता अनुदान देण्यात येत आहे. याच योजनेची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

कम्बाईन हार्वेस्टर खरेदीवर मिळणार 11 लाख रुपये अनुदान

कम्बाईन हार्वेस्टर हे यंत्र शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे यंत्र असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही हे यंत्र चालवू शकतात. तसेच यामध्ये ऑटोमॅटिक पद्धतीने ऑपरेट होणारे कम्बाईन हार्वेस्टर देखील आहे. आपल्याला माहित असेलच की कम्बाईन हार्वेस्टरच्या मदतीने शेतकरी पिकांची कापणी करू शकतात तसेच मळणी करू शकतात तसेच कापलेले पीक गोळा करण्यापासून तयार झालेल्या धान्याची साफसफाई करण्याची कामे एकाच वेळी करणे शक्य आहे.

हे यंत्र मका तसेच सोयाबीन व गहू पिकांसाठी खूप फायदेशीर आहे. अशा या महत्त्वाच्या यंत्रावर शासनाच्या सबमिशन ऑन अग्रिकल्चर मेकॅनिझेशन योजनेच्या माध्यमातून सहा फूट कटर बार रुंदी असलेल्या कम्बाईन हार्वेस्टर वर अनुदानाचा लाभ दिला जात असून या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती, लहान शेतकरी व मजूर आणि महिलांना कम्बाईन हार्वेस्टर खरेदीवर पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त 11 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. तर सर्वसाधारण प्रवर्गातील व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40% अनुदान किंवा जास्तीत जास्त आठ लाख 80 हजार रुपये पर्यंत अनुदानाचा लाभ मिळतो.

किती असते कम्बाईन हार्वेस्टरची किंमत?

जर आपण कम्बाईन हार्वेस्टरच्या कंपन्यांचा विचार केला तर यामध्ये करतार, न्यू हॉलंड तसेच महिंद्रा, कुबोटा सारख्या कंपन्यांचे हार्वेस्टर हे सर्वात उत्तम मानले जातात. परंतु या अनुदानासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या कृषी विभागाने ज्या डीलरची नोंदणी केलेली आहे त्याकडूनच तुम्हाला हार्वेस्टर खरेदी करावे लागणार आहे.

तसेच यासाठीचे कोटेशन आणि टेस्टिंग रिपोर्टचे कागदपत्र तुम्हाला आवश्यक असतात. या कागदपत्रांशिवाय तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळू शकत नाही. जर आपण कम्बाईन हार्वेस्टरची अंदाजे किंमत पाहिली तर ती पाच लाख 35 हजारपासून ते 26 लाख 70 हजार रुपयापर्यंत आहे. कृषी यंत्रांची जी काही किंमत आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जातो.

या अनुदानासाठी लागणारी कागदपत्रे

कम्बाईन हार्वेस्टर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाच्या दाखला, सातबारा व आठ अ सारखे शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रे, बँकेच्या पासबुकची प्रत तसेच मोबाईल नंबर( आधार नंबरशी लिंक असलेला) आणि शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.

यासाठी अर्ज कुठे कराल?

कृषी यांत्रिकीकरण योजनेवरील उप अभियान या योजनेअंतर्गत कम्बाईन हार्वेस्टर साठी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी अर्थात कॉमन सर्विस सेंटर वरून अर्ज करू शकणार आहात.