Caste Validity Certificate : शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, शेतमजुरांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य गरीब जनतेसाठी कायमच नवनवीन योजना सुरू केल्या जातात. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची योजना शासन राबवते.
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही शासनाकडून नवनवीन योजना सुरू केल्या जातात. यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून विशेष मदत दिली जाते. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी शासनाकडून या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात सूट दिली जाते.
हे पण वाचा :- रेल्वेचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांना रेल्वेच तिकीट मिळणार फ्री, ‘त्यां’च्या नातेवाईकांना पण मिळणार लाभ, पहा…..
यासाठी मात्र या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट अर्थातच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. पण कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट काढण्यासाठी या मागासवर्गीय उमेदवारांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. दरम्यान आता नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.
जिल्ह्यातील दहावी व बारावी मध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत एक विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील अकरावी व बारावी मध्ये विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवून दिले जाणार आहे.
यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंत विशेष मोहीम राबवली जात असल्याची माहिती जिल्ह्याचे उपायुक्त तथा नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य राकेश पाटील यांनी दिली आहे. दरम्यान या मोहिमेअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट काढून घ्यावे असे आवाहन केले जात आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट साठी ऑनलाईन अर्ज भरताना सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करावेत आणि अपलोड केलेला अर्ज व मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती व मूळ शपथपत्र जिल्हा जात पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्र, नाशिक येथे जमा करावा असे आवाहन देखील केले जात आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट लवकर काढता येणे शक्य होणार आहे.
हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा उन्हाळी सोयाबीन लागवडीचा यशस्वी प्रयोग; मिळवलं विक्रमी उत्पादन, पहा….