विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! आता 10 ते 15 दिवसांत मिळणार कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट; ‘या’ ठिकाणी करा अर्ज, ही कागदपत्रे तयार ठेवा, पहा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Caste Validity Certificate Online Application : उच्च शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आज आम्ही घेऊन हजर चालू आहोत. खरं पाहता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्या आहेत. यामध्ये लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहेत आणि यापैकी बहुतांशी विद्यार्थी हे उच्च शिक्षणासाठी जाणार आहेत. उच्च शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र काही कागदपत्रांची नितांत आवश्यकता या ठिकाणी भासत असते.

कागदंपत्रे पूर्ण असली म्हणजे विद्यार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेता येतो आणि अल्प खर्चात त्यांचे शिक्षण या ठिकाणी पूर्ण होत असते. विशेषता शासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजना सुरू केल्या जातात यामध्ये स्कॉलरशिपची योजना आहे, तसेच इतरही अन्य योजना शासन सुरू करत असते. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात देखील मोठी सवलत दिलेली असते.

हे पण वाचा :- सावधान ! आज ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

उच्च शिक्षणासाठी खूप अधिक प्रवेश शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागते. या परिस्थितीत या मागासवर्गीयांना शिक्षण घेणे आव्हानात्मक बनते. हेच कारण आहे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रवेश शुल्कात सवलत दिली जाते मात्र यासाठी विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट अर्थातच जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते.

दरम्यान आता विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना कोणतीच अडचण येऊ नये या पार्श्वभूमीवर जात पडताळणी समितीकडून मात्र दहा ते पंधरा दिवसात कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना दिलं जात आहे. दरम्यान, आज आपण कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट काढण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज कुठे करावा लागेल, तसेच यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा अंदाज पुन्हा ठरला खरा ! आता पुढचा अंदाज नेमका काय? केव्हा थांबणार पावसाचं थैमान, पहा पंजाब डख काय म्हणताय…..

कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

अर्जदार विद्यार्थ्यांचे आधारकार्ड

अर्जदार विद्यार्थ्यांचे  रेशनकार्ड 

अर्जदाराच्या वडिलांचे आधारकार्ड अन रेशनकार्ड

अर्जदार विद्यार्थ्यांचा स्वत:चा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच लिविंग सर्टिफिकेट

अर्जदार विद्यार्थ्यांच्या वडिलांचा, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला 

अर्जदार विद्यार्थ्यांचे वडिलांचे, आजोबांचे शैक्षणिक कागदपत्रे नसल्यास १९६० पूर्वीचा खरेदी दस्त, सातबारा, फेरफार किंवा अन्य कागदपत्रे देखील यासाठी उपयोगी असतात. 

सदर अर्जदार विद्यार्थ्याचे बोनाफाईड व प्राचार्यांकडून भरलेला (१५-अ) अर्ज व प्राचार्यांचे पत्र लागते.

वंशावळ व कागदपत्रे खरी असल्यासंबंधी तहसील कार्यालयातील दोन प्रतिज्ञापत्र देखील यासाठी सादर करावी लागतात.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! एनपीसीआईएलमध्ये ‘या’ 325 रिक्त जागांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज

अर्ज कुठे करावा लागणार?

कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट काढण्यासाठी विद्यार्थ्यांना www.bartyvalidity.gov.in आणि www.ccvis.com या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी आपली माहिती योग्यरीत्या भरणे आवश्यक असते. माहिती अचूक भरावी तसेच ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करणे गरजेचे आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट या ठिकाणी घेणे अपेक्षित आहे.

यानंतर या प्रिंट आऊट सोबत विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व कागदपत्रांची मूळ प्रत घेऊन आपल्या जिल्ह्यातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जावे लागणार आहे. जर विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यातील असतील तर त्यांनी सोलापुरातील सात रस्ता परिसरातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात ऑफलाईन अर्ज द्यायचा आहे. मग या समितीच्या माध्यमातून सदर विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी होत असते.

जर परिपूर्ण प्रस्ताव असेल तर विद्यार्थ्यांना मात्र 15 दिवसात जात वैधता प्रमाणपत्र मिळून जाते. मात्र जर प्रस्तावामध्ये काही अडचणी असतील तर सहा महिन्यांपर्यंतचा काळ लागत असतो. त्यामुळे जर विद्यार्थ्यांचा प्रस्ताव परिपूर्ण असेल म्हणजेच सर्व कागदपत्रे दिलेली असतील तर विद्यार्थ्यांना पंधरा दिवसात जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट दिले जाते अशी माहिती देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाबाबत मोठी अपडेट; शासन निर्णय निर्गमित, पहा….