Cibil Score Complaint : सिबिल स्कोर अर्थातच क्रेडिट स्कोर हा कर्ज घेण्यासाठी एक अति महत्त्वाचा घटक आहे. हा स्कोर 300 ते 900 दरम्यान मोजला जातो. हा स्कोर जेवढा अधिक तेवढेच सिबिल चांगले, म्हणजेच कर्जाचा इतिहास चांगला आणि मग अशा चांगल्या सिबिल असलेल्या लोकांना बँकेकडून कर्ज देण्यास अधिक उत्सुकता दाखवली जाते. मात्र जर सिबिल स्कोर कमी असेल तर बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात.
अनेकदा कमी सिबिल स्कोर असले तरी देखील कर्ज मंजूर होते मात्र अधिक व्याजदर आकारला जातो तसेच कर्जाची मर्यादा ही कमी केली जाऊ शकते. यामुळे सिबिल स्कोर चांगला ठेवणे हे अति आवश्यक आहे. जाणकार लोकांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की ज्या लोकांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो अशा लोकांना सहसा बँका कर्ज देण्यास उत्सुक असतात, अशा लोकांना कमी व्याजदरात आणि अधिक कर्ज मंजूर होतं.
मात्र असे असले तरी सिबिल स्कोर चांगला असला आणि उत्पन्नाचे साधन चांगले नसले तरीही कर्ज घेताना अडचण येऊ शकते. यामुळे सिबिल हा कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेला इतर घटकांसारखाच एक घटक आहे.
हे पण वाचा :- पंजाबराव डख यांचा मोठा दावा; यंदा ‘या’ भागात महापूर येणार, पहा आणखी काय म्हटले डख
पण केवळ याच एका घटकाच्या आधारावर कर्ज मिळणार की नाही मिळणार हे ठरत नाही. मात्र कर्ज मिळवण्यासाठी अति आवश्यक असलेला हा घटक नेहमीच चांगला ठेवण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. दरम्यान अनेक लोकांना असं वाटतं की त्यांनी त्यांच्या कर्जाची वेळेवर परतफेड केली आहे, क्रेडिट कार्डची लिमिट 30% पेक्षा कमीच वापरली आहे, तसेच ईएमआयचे हप्ते देखील वेळेवर दिले आहेत मात्र तरीही त्यांचा सिबिल खूप कमी आहे.
मग अशा व्यक्तींनी काय केलं पाहिजे हाच मोठा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होतो. दरम्यान यासाठी देखील एक पर्याय उपलब्ध आहे. अशा व्यक्तींना सिबिलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज किंवा तक्रार सादर करता येते. यासाठी सिबिलच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी क्रेडिट रिपोर्ट या विभागात शोध घेतला पाहिजे.
यानंतर विवाद केंद्रावर जाऊन सीबीलचा ऑनलाईन विवाद निराकरण फॉर्म संबंधित व्यक्तीला भरावा लागतो. जाणकार सांगतात की, व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, पॅन कार्ड वरील तपशील, मोबाईल नंबर इत्यादी माहिती जर चुकीची प्रविष्ट झाली असेल तरीही सिबिल स्कोर कमी होऊ शकतो.
हे पण वाचा :- शेतीमध्ये बदल गरजेचाच; पारंपारिक पिकाला फाटा देऊन सुरु केली फुलशेती, बनले लाखोंचे धनी; वाचा ही यशोगाथा
याशिवाय चुकीचे कर्ज खाते जोडले जाणे, चुकीची थकबाकी माहिती, चुकीची क्रेडिट मर्यादा, तसेच कर्ज परतफेडच्या पद्धतीबाबत दिलेले चुकीची माहिती या सर्व कारणांमुळे देखील सिबिल स्कोर खराब होतो. यामुळे संबंधित व्यक्तीला जर आपल्या सिबिल बाबत काही तक्रार असेल तर नेमकी वर नमूद करण्यात आलेल्या कोणत्या चुकीमुळे सिबिल डाउन झाला आहे याची निवड करून तक्रारीसाठी सुरुवात करावी.
सिबिलच्या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार दाखल केल्यानंतर सिबिल यंत्रणा आपल्या संबंधित बँकेकडे संपर्क साधत असते. म्हणजेच सिबिल परस्पर तुमच्या तक्रारीवर दखल घेत नाही. त्यासाठी सिबिल सत्यता तपासते. यामुळे तुम्ही तुमची तक्रार सादर करताना काही असे पुरावे सादर करू शकतात ज्यामुळे तुम्ही उपस्थित केलेला विवाद हा सत्यापित केला जाऊ शकतो.
तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर जवळपास 30 दिवसांचा कालावधी या तक्रार निवारण्यासाठी लागतात. 45 दिवसात बँकेकडून याचे निराकरण होणे आवश्यक असते. याबाबतचा निर्णय झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला ई-मेलच्या माध्यमातून याविषयी सुचित केले जाते. मात्र याबाबत जर संबंधित व्यक्तीला समाधान वाटत नसेल तर तो पुन्हा एकदा चुकीची नोंद काढून टाकण्यासाठी सिबिल कडे अर्ज करू शकतो.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! 30 अन 31 मार्चला होणार दानाफान, ‘या’ भागात पुन्हा गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा गंभीर इशारा