Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

तुम्हालाही सिबिल स्कोरमुळे कर्ज मिळत नाही का? मग ‘या’ ठिकाणी करा तक्रार

Cibil Score Complaint : प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा कर्जाची गरज पडत असते. स्वप्नातील घर बांधण्यासाठी, वाहन घेण्यासाठी, लॅपटॉप किंवा मोबाईल सारख्या महागड्या वस्तू घेण्यासाठी किंवा काही वैयक्तिक कारणांसाठी कर्ज हे घ्यावं लागतच. मात्र कर्ज घेताना बँकांकडून सर्वप्रथम एका गोष्टीची विचारणा होते आणि या गोष्टीवरच त्या संबंधित व्यक्तीला कर्ज मिळेल की नाही याचा निर्णय हा बँकेचा सक्षम अधिकारी घेत असतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आता प्रश्न असा उपस्थित होतो की ही गोष्ट कोणती? तर ही गोष्ट आहे सिबिलची. ज्या व्यक्तीचा सिबिल खराब असतो त्याला बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र ज्या व्यक्तीचा सिबिल हा चांगला असतो अशा व्यक्तीला झटपट आणि कमी व्याजदरात कर्ज बँकेच्या माध्यमातून दिलं जातं.

कर्ज मंजूर करणारा बँकेचा सक्षम अधिकारी अधिक सिबील असलेल्या व्यक्तीला कर्ज देण्यास उत्सुक असतो. तर ज्या व्यक्तीच सिबिल हे खराब असतं त्या व्यक्तीचे उत्पन्नाचे स्रोत चांगले असतानाही अनेकदा बँकेच्या सक्षम अधिकाऱ्याकडून कर्जा संदर्भात वेगवेगळ्या निकषांची कसून पूर्तता करून घेतली जाते, अन मग एक तर कर्ज नाकारतो किंवा दिलही तरी कमी कर्ज त्याला मंजूर होतं.

हे पण वाचा :- रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता ‘या’ लोकांना मिळणार तिकीट दरात मोठी सवलत, पहा

आता प्रश्न असा पडतो की हा सिबिल जर चुकून कमी झाला असेल, बँक किंवा इतर वित्तीय संस्थांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे तुमचे क्रेडिट रेटिंग खराब झाले असेल तर मग काय करायच? कुठे तक्रार करायची. वास्तविक सिबिल किंवा तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब झाली आहे की नाही हे सिबिल स्कोर वरून ठरतं.

मात्र अनेकदा बँकांच्या चुकीमुळे किंवा अन्य काही कारणामुळे कर्जाची वेळेवर परतफेड केलेली असतानाही, चालू असलेले सर्व ईएमआय किंवा हप्ते वेळेवर फेडलेले असतानाही जर सिबिल स्कोर कमी असेल तर असे व्यक्ती किंवा ग्राहक या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी CIBIL तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधू शकतात. तुमच्या क्रेडिट रिपोर्ट किंवा सिबिल स्कोरमधील कोणतीही माहिती चुकीची असल्यास, तुम्ही अधिकृत CIBIL वेबसाइटवर उपलब्ध असलेला CIBIL ऑनलाइन विवाद फॉर्म भरून तो दुरुस्त करून घेऊ शकता.

हे पण वाचा :- पंजाबराव डख हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अति-मुसळधार पावसाचा इशारा, कोसळणार अवकाळी !

आता तक्रार कुठे करायची हे जाणून घ्या 

अशा संबंधित व्यक्तीला त्याच्या CIBIL स्कोअरबद्दल काही समस्या असल्यास, तो cibil च्या https://www.cibil.com/dispute या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘आमच्याशी संपर्क साधा’ म्हणजे Contact Us विभाग उघडू शकतो आणि विवाद फॉर्म भरू शकतो. याशिवाय असा व्यक्ती CIBIL शी संबंधित तक्रार कंपनीला हेल्पलाइन क्रमांक च्या मदतीने देखील कळवू शकणार आहे. या तक्रारीसाठी हा 22-61404300 ग्राहक हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

संबंधित व्यक्ती यावर कॉल करून आपली तक्रार या ठिकाणी नोंदवू शकणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधता येतो. म्हणजेच कार्यालयीन वेळेतच ग्राहकाला आपली तक्रार या ठिकाणी नोंदविता येणार आहे. यासोबतच ग्राहकांच्या सोयीसाठी 22-66384666 हा फॅक्स क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे.

यावर ग्राहक फॅक्स करून आपली तक्रार नोंदवू शकणार आहेत. याशिवाय आपली तक्रार संबंधित व्यक्ती ई-मेलच्या माध्यमातून पोहोचवू शकणार आहेत. यासाठी info-cibil.com या ईमेलवर ग्राहकाला आपली तक्रार नोंदवावी लागणार आहे. किंवा संबंधित व्यक्ती सिबिलच्या रजिस्टर ऑफिसला भेट देऊन देखील आपली तक्रार सोडवू शकणार आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! म्हाडाने अनामत रकमेबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा सविस्तर