Cidco News: खुशखबर! ‘या’ तारखेला होणार सिडकोच्या 8 हजार घरांची योजना जाहीर, ‘त्या’ घरांच्या किमती होणार कमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cidco News:- पुणे तसेच मुंबई, नासिक आणि औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येकाला ही इच्छा पूर्ण करता येईल असे नव्हे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना परवडणाऱ्या दरांमध्ये घरे दिली जातात.

विशेष म्हणजे यामध्ये  नागरिकांना घरे घेताना विशेष सोयी सवलती देखील मिळतात. त्यामुळे बऱ्याच नागरिकांना म्हाडा आणि सिडकोच्या घरांच्या विविध योजनेची प्रतीक्षा असते. असे प्रतीक्षात असलेल्या नागरिकांसाठी सिडकोच्या घरांच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.

 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाला होणार सिडकोच्या 8000 घरांची योजना जाहीर

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पुढील महिन्यातील 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर  समाजातील विविध आर्थिक घटकांकरिता जुन्या प्रकल्पातील जे काही शिल्लक घरे राहिलेल्या आहेत त्यांची आणि नवीन आठ हजार घरांसाठीची योजना जाहीर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे बहुतांशी घरे हे केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरिता असतील असे देखील माहिती समोर आलेली आहे.

या योजनेमध्ये जुईनगर, खांदेश्वर, खारघर तसेच तळोजा इत्यादी ठिकाणच्या घरांचा समावेश असणार आहे. सिडको चा विचार केला तर  येणाऱ्या पाच वर्षांमध्ये सिडको आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांकरिता तब्बल 86 हजार 588 घरे बांधणार असे निश्चित केलेले आहे. या पार्श्वभूमीवर एकाच वेळामध्ये चार टप्प्यात ही घरे उभारली जात आहेत.

एवढेच नाही तर या घरांच्या कामाकरिता 4417 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. सध्या जर आपण या घराच्या कामांची स्थिती पाहिली तर तळोजा नोडमध्ये विविध भागात 20448 घरांचे बांधकाम सध्या सुरू आहे. त्यासोबतच वाशी तसेच खारघर बस स्थानक आणि ट्रक टर्मिनल तसेच कळंबोली इत्यादी ठिकाणी देखील 21,346 घरांचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे.

या घरांसोबतच जुईनगर आणि खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या फोर कोर्ट परिसरामध्ये 20821 घरांचे बांधकाम सध्या सुरू आहे.  या सगळ्या प्रकल्पांमधून आठ हजार घरांची योजना 15 ऑगस्ट या दिवशी जाहीर करण्याचा निर्णय देखील सिडको ने घेतला असल्याचे समोर आले आहे.

 या घरांच्या किमती होणार कमी

यामध्ये महत्त्वाचे म्हणजे सिडको ने नुकतीच खारकोपर आणि बामण डोंगरी रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरांची सोडत काढलेली होती. परंतु या घरांच्या किमती महाग असल्याच्या तक्रारी अर्जदारांनी केलेल्या होत्या. त्यामुळे आता या घरांच्या किमती कमी करण्याचे सिडकोने निश्चित केलेले आहे. परंतु किती किंमत कमी करता येईल याबाबतचे धोरण अजून पर्यंत ठरवण्यात आलेले नाही. परंतु या बाबतीत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे देखील समोर आलेले आहे.