गुड न्यूज आली रे…..; आता कापूस दरात होणार ‘या’वेळी ‘इतकी’ वाढ

Cotton Rate Hike : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तज्ञ लोकांकडून कापूस दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय दरात आलेले तेजी. चीन, पाकिस्तान कडून वाढती मागणी, भारतात सुरू होणारे कापूस वायदे, दरात आलेली कमी आणि त्यामुळे बाजारात होत असलेली कमी आवक यामुळे कापूस दरात वाढ होण्याची शक्यता तज्ञ लोकांकडून वर्तवण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या चालू महिन्यात कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळू शकतो असा अंदाज जाणकार लोकांनी बांधला आहे. वास्तविक कापसाचा हंगाम सुरू होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. अशा परिस्थितीत आता दरवाढ झाली तरच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

शिवाय पुढल्या महिन्यात शेतकऱ्यांना मार्च एंडिंग मुळे कर्जाचे हप्ते देणे भाग आहे. काही इतर देणी देखील शेतकऱ्यांच्या प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आता कापूस विक्री करणे भाग पडणार असून जर या महिन्यात भाव वाढ झाली नाही तर शेतकऱ्यांची पिळवणूक होणार आहे.

Advertisement

दरम्यान जाणकार लोकांनी चालू महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी एंडिंग पर्यंत साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल ते नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर कापसाला मिळू शकतो असा एक अंदाज बांधला आहे. म्हणजेच कापूस दहा हजार रुपये प्रति क्विंटल च्या घरात लवकरच पोहचणार असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. निश्चितच हा एक अंदाज असला तरी देखील यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आंतरराष्ट्रीय बाजारात असं घडलं की, ‘या’ महिन्यात देशांतर्गत कापसाचे दर 10 हजार पार जाणार, तज्ज्ञांचा…

Advertisement