Cow Interesting Fact: तुम्हाला माहित आहेत का गाईबद्दलच्या ‘या’ आश्चर्यकारक गोष्टी! वाचाल तर वाटेल तुम्हाला नवल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cow Interesting Fact:- भारतीय संस्कृतीमध्ये गाय खूप पवित्र मानली जाते. भारतामध्ये देवासमान गाईची पूजा केली जाते इतके महत्त्व गाईला आहे. गाईचे गोमूत्र तसेच दूध देखील अत्यंत उपयुक्त असून मानवी शरीरासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

जर भारतीय शेतकऱ्यांचा पशुपालन व्यवसायाचा विचार केला तर भारतामध्ये दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर गाई पाळल्या जातात. यामध्ये संकरित गाईंचे प्रमाण सध्या मोठे असून त्या खालोखाल गीर तसेच साईवाल, देवनी आणि  खिल्लार यासारख्या देशी गाई मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातात.

संकरित गाईंमध्ये जर्सी, हॉल स्टेन फ्रिजियन यासारख्या गाईंचे प्रमाण मोठे आहे. वाढीव दूध उत्पादनाकरिता शेतकऱ्यांसाठी गाय खूप उपयुक्त असून शेतकऱ्यांचा एक आर्थिक कणा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु याच गाईबद्दल जर आपण काही गोष्टी पाहिल्या तर त्या खूप आश्चर्यचकित करणारे आहेत. काही गोष्टी आपल्याला माहिती असतीलही किंवा काही नसतीलही त्यामुळे आपण या लेखात गाईविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत.

 गाईविषयी काही रंजक माहिती

1- गाईंचा उगम कुठे झाला?- ज्या काही पाळीव गाई असतात त्यांनाच टॉरिन गाई म्हणून देखील ओळखले जाते. या गाई ऑरोच म्हणून ओळखला जाणारा जो काही जंगली बैल आहेत त्यांच्या वंशज आहेत व त्या सुमारे दहा हजार पाचशे वर्षांपूर्वी आग्नेय तुर्कीमध्ये प्रथम पाळण्यात आले होते असे म्हटले जाते.

त्यानंतर भारतामध्ये 1627 च्या आसपास जंगली ऑरोच शिकार आणि इतर कारणांमुळे नष्ट झाल्या किंवा नामशेष झाल्या. परंतु असे असताना देखील त्यांची अनुवंशिकता इतर वंशांमध्ये राहिली व त्यामुळे जंगली याक, पानथळ म्हशी आणि अर्थात पाळीव गाई यांचा त्यामध्ये समावेश होता.

2- गाई आळशी असतात गाईंच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती घेतली तर गाई या खूप आळशी असतात व त्यांना आराम करायला आवडते असे म्हटले जाते. दिवसातील दहा ते बारा तास गाई आडव्या पडून असतात किंवा बसून असतात. परंतु या कालावधीमध्ये ते झोपत नाही परंतु विश्रांती मोठ्या प्रमाणावर घेतात. झोप अपुरी घेत असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि वागणुकीवर देखील परिणाम होतो.

3- गाईंना खेळायला देखील आवडते सस्तन प्राण्यांमध्ये गाई या खेळाची आवड असणारा प्राणी आहे. यामध्ये त्या धावणे तसेच बॉल खेळणे इत्यादी  गोष्टी करू शकतात. ज्याप्रमाणे कुत्र्यांना डोके किंवा मान किंवा पाठीवर गोंजारलेले आवडते प्रमाणे गाईंना देखील आवडते.

4- गाईंना बेस्ट फ्रेंड देखील असतात काहींना चांगले मित्र देखील असतात. जेव्हा गाई त्यांच्या आवडत्या मित्रापासून दूर होतात तेव्हा त्या खूप तणावात जातात. याबाबतीत करण्यात आलेले आहे का अभ्यासात क्रिस्टा मॅकलेनन यांनी असा निष्कर्ष काढला आहे की गाईंना आवडते मित्र असतात व ते वेगळे झाल्यावर तणावग्रस्त होतात. जेव्हा असे पाळीव प्राणी त्यांच्या अत्यंत आवडीच्या साथीदारासोबत असतात तेव्हा त्यांच्या हृदयाच्या गतीच्या दृष्टीने त्यांच्या तणावाची पातळी खूप कमी होते.

5- गाईंना पोहता येते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गाईंना पाण्यामध्ये उत्तम पद्धतीने पोहता येते. पोहण्यामध्ये गाई अत्यंत तरबेज असतात. एवढेच नाही तर त्यांना वासाची देखील उत्कृष्ट जाणीव असते म्हणजेच वास देखील त्यांना चटकन ओळखता येतो. सहा मैल अंतरावरचा वास त्या ओळखू शकतात.