प्रेरणादायी ! पुणे जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने सुरु केल गौ-पालन; आता महिन्याकाठी कमवतो लाखोंचा नफा, पहा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cow Rearing : गेल्या काही वर्षांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना नानाविध अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. हजारो रुपयांचा खर्च करून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शक्तीतून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाहीये. शिवाय नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करून बहुकष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला देखील बाजारात अपेक्षित भाव मिळत नाहीये. परिणामी बळीराजा आसमानी आणि सुलतानी संकटात भरडला जात आहे.

यामुळे अलीकडे शेती नको रे बाबा असा ओरड सर्वत्र पाहायला मिळत आहे. अनेकांनी तर शेती सोडून इतर उद्योगधंद्यात उडी घेतली आहे. काही शेतकरी पुत्रांनी आता शेती नको तर नोकरीच बरी असा सूर आता लावायला सुरवात केली आहे. मात्र अशा या प्रतिकूल परिस्थितीत देखील काही प्रयोगशील शेतकरी आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून तसेच शेतीला जोडव्यवसायाची सांगड घालत शेतीमधून लाख रुपयांची कमाई करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात देखील असाच एक कौतुकास्पद प्रयोग पाहायला मिळाला आहे. तालुक्यातील मौजे दहिवडी येथील हनुमंत इंगळे या प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीशी निगडीत व्यवसाय असल्याने पशुपालन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी हा पशुपालन व्यवसाय मात्र दोन गाई खरेदी करून सुरू केला. दिवसेंदिवस या व्यवसायातून त्यांना चांगली कमाई झाली आणि आता त्यांच्याकडे सात गाई आहेत तसेच सहा कालवडी आहेत. सात गाई दुधाळ आहेत आणि यापासून त्यांना रोजाना 90 लिटर एवढे दूध उत्पादन मिळत आहे.

निश्चितच यातून त्यांना रोजाना कमाई होत असून लाखो रुपयांची उलाढाल ते करत आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत आठ गाई विकल्या असून यातूनही त्यांना लाखो रुपये मिळाले आहेत. त्यांच्याकडे सध्या निवडक आणि उच्च प्रतीच्या गायी आहेत. तसेच ज्या कालवडी आहेत त्या देखील उच्च प्रतीच्या वळूच्या ब्रीडपासून तयार करण्यात आले आहेत. यामुळे त्यांना पुढील काळात या कालवडीपासून जवळपास 30 ते 35 लिटर दूध प्रति गाय मिळणार आहे. हनुमंत यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाईंसाठी त्यांनी मुक्त संचार गोठा तयार केला आहे जो की दहा गुंठे क्षेत्रावर आहे.

यामुळे गाई निरोगी राहतात आणि चांगले दूध उत्पादन देतात असं त्यांचं मत आहे. दुधाच्या उत्पादनाशिवाय त्यांना शेणखत विक्रीतूनही चांगला नफा मिळत आहे. गाईंना चाऱ्याची सोय करण्यासाठी ते आपल्या शेतातच चारा पिकाचे उत्पादन घेत आहेत. प्रामुख्याने मक्याचे ते उत्पादन घेतात आणि मुरघास यापासून बनवत असतात. मूरघास मुळे दूध उत्पादन वाढते असं त्यांचं मत आहे. या पशुपालन व्यवसायात त्यांना त्यांच्या परिवाराची देखील मोठी साथ लाभत असून आई-वडिलांचे मार्गदर्शन कामी येत आहे.

निश्चितच एकीकडे तरुणाई जी की शेतकरी कुटुंबातून असते तरीही शेती नको रे बाबा असं म्हणत नोकरी मागे धावत आहे तर दुसरीकडे हनुमंत सारखे नवयुवक शेती व शेतीपूरक व्यवसायामधून लाखो रुपयांची कमाई करत इतरांसाठी मार्गदर्शन काम करत आहेत. निश्चितच हनुमंत यांनी केलेली ही कामगिरी इतरांसाठी प्रेरक राहणार आहे.