सीआरपीएफमध्ये नवीन भरतीची घोषणा; ‘या’ पदाच्या 212 जागांसाठी होणार भरती, पगार मिळणार प्रति महिना 90 हजार, जाहिरात पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CRPF Recruitment : सीआरपीएफ मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकतीच सीआरपीएफने 9000 हून अधिक रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना काढली होती.

यासाठी लाखों उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा सीआरपीएफने एक नवीन भरती काढली आहे. या भरतीच्या माध्यमातून 212 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

त्यामुळे देशसेवेची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी राहणार आहे. दरम्यान आज आपण या पदभरतीसाठी सर्व आवश्यक माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदासाठी होणार आहे भरती

सीआरपीएफने नवीन भरतीची घोषणा केली असून यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार सीआरपीएफ मध्ये उपनिरीक्षक (एसआय) / सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती?

या भरतीच्या माध्यमातून वर नमूद केलेल्या दोन्ही पदांच्या 212 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

यासाठीच्या शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचना बघावी लागणार आहे.

किती मिळणार पगार?

सदर जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक (एसआय) या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 35,400 – 1,12,400 रुपये प्रतिमहिना इतक मानधन दिल जाणार आहे.

तसेच सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 रुपये प्रतिमहिना इतक मानधन दिल जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://rect.crpf.gov.in/ या लिंक वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक?

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 21 मे 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. विहित कालावधीमध्ये उमेदवाराला आपला अर्ज सादर करावा लागणार आहे.

जाहिरातीची Pdf कुठं पाहणार?

या पदभरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण पीडीएफ पाहू शकता.

https://drive.google.com/file/d/1Ifkm0h-3TCFW4lgD0gxpnFoiMOXEa1gA/view?usp=drivesdk