कौतुकास्पद ! प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ पिकाची शेती करत मात्र 29 गुंठ्यात मिळवलं 3 लाखांचं उत्पन्न, पहा ही भन्नाट यशोगाथा

Cucumber Farming : अलीकडे शेतकरी बांधव अल्प कालावधीत काढण्यासाठी तयार होणाऱ्या पिकांची शेती करू लागले आहेत. या अशा हंगामी पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील असाच काहीसा प्रयोग केला आहे. जिल्ह्यातील लाडसावंगी येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र आपल्या 29 गुंठे शेत जमिनीत काकडी या हंगामी पिकाची शेती करून तीन लाखांचे उत्पन्न घेतल आहे.

यासाठी मात्र त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता.विशेष म्हणजे शासकीय योजनेचा लाभ घेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यांनी काकडीची शेती यशस्वी करत इतर शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक असं काम केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बंडू नारायण पडूळ असं या शेतकऱ्याचं नाव असून आज आपण बंडू यांनी शेती मध्ये केलेली ही अभूतपूर्व कामगिरी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, बंडू यांनी शासकीय योजनेचा लाभ घेत आपल्या 40 गुंठे शेत जमिनीत शेडनेटची उभारणी केली. शेडनेट उभारणीसाठी त्यांना पोखरा योजनेअंतर्गत अनुदान मिळालं होतं.

पोखरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत अनुदानाचा लाभ घेत त्यांनी आपल्या चाळीस गुंठे शेत जमिनीत शेडनेट उभारल्यानंतर यापैकी वीस गुंठे शेत जमिनीत काकडीची लागवड केली तर वीस गुंठे शेतजमीनीत शिमला मिरचीची त्यांनी लागवड केली.

दरम्यान पडूळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या 28 रुपये प्रति किलो असा काकडीसाठी दर मिळत असून असाच बाजार भाव जर पुढे देखील कायम राहिला तर त्यांना वीस गुंठे शेत जमिनीतून तीन लाखांपर्यंतची कमाई होण्याची आशा आहे. निश्चितच केवळ अर्धा एकर शेत जमिनीतून 3 लाखांची कमाई करून पडूळ यांनी इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.

विशेष म्हणजे पडुळ यांनी आपल्या शेतात जवळपास 12 स्थानिक महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. निश्चितच बंडू पडूळ यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी इतरांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. शासकीय योजनेचा लाभ जर शेतकऱ्यांना मिळाला तर तो शेतीतून सहजतेने लाखो रुपयांची कमाई करू शकते हेच बंडू यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.