DA Hike:- येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकसभेचे निवडणुकीचे बिगुल वाजणार असून लोकशाहीचा सगळ्यात मोठा महोत्सव हा भारतात पार पडणार आहे. त्यामुळे साहजिकच सरकारला जनतेच्या हिताचे निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. कारण निवडणुकांच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिक असो की सरकारी कर्मचारी यांची नाराजी ओढवून घेणे हे कुठल्याही सरकारच्या फायद्याचे नसते.
त्यामुळे या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये केंद्र सरकारी कर्मचारी असो की राज्य सरकारचे कर्मचारी यांच्या बाबतीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर जर आपण महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केला तर राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यासंबंधीचे महत्त्वाचे अपडेट या लेखात आपण बघणार आहोत.
या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनासोबत मिळणार महागाई भत्ता वाढीचा लाभ
आपल्याला माहित असेलच की, गेल्या महिन्यामध्ये राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्तातील वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर 30 जून 2023 रोजी यासंबंधीचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला. या शासन निर्णयानुसार आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ लागू करण्यात आलेला आहे.
तसेच या निर्णयानुसार विचार केला तर ही जी महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे ती जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असल्यामुळे जानेवारी महिन्यापासून या फरकाची रक्कम देण्याचे देखील या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे हा लाभ कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनासोबत देण्याचे जवळपास निश्चित करण्यात आलेले आहे. परंतु यासंबंधीचा शासन निर्णय जेव्हा निर्गमित करण्यात आला.
तेव्हा राज्य सरकारच्या बऱ्याच विभागातील कर्मचाऱ्यांची वेतनाची बिले तयार झालेली होती.त्यामुळे शासन निर्णय जेव्हा निर्गमित करण्यात आला त्यावेळी ज्या कर्मचाऱ्यांची वेतन बिले तयार झालेली होती अशा कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि फरकाचा लाभ रोखीने जुलै महिन्याचे वेतन म्हणजेच जे ऑगस्टमध्ये वेतन होईल तेव्हा देण्यात यावा असे राज्याच्या कोषागार विभागाकडून निर्देशित करण्यात आलेले आहे.
म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना आता जून महिन्याच्या वेतना सोबत महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम त्यांचा लाभ मिळालेला नाही, अशा कर्मचाऱ्यांना आता जुलै महिन्याच्या वेतना सोबत हा लाभ दिला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा लाभ निवृत्तीवेतन धारकांना आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना देखील देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यासंबंधीचा शासन निर्णय हा 5 जुलै रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. म्हणजेच निवृत्तीवेतनधारकांना देखील हा लाभ आता जुलै महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे.