Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; नाबार्डकडून डेअरी व्यवसायासाठी मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं कर्ज, पहा डिटेल्स

Dairy Farming Nabard Loan : गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसायात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता शेती सोबतच शेतीपूरक व्यवसायाची गरज असल्याचे जाणकारांकडून सांगितलं जात आहे.

Dairy Farming Nabard Loan : गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसायात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता शेती सोबतच शेतीपूरक व्यवसायाची गरज असल्याचे जाणकारांकडून सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून देखील शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र पशुपालन व्यवसायात शेतकऱ्यांना भांडवलाची नितांत आवश्यकता असते. डेअरी फार्मिंग सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना लाखो रुपयांची गरज भासत असते. अशा परिस्थितीत अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना हा व्यवसाय करताना नानाविध अशी अडचणी येतात. यामुळे जरी डेअरी व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असला तरी देखील सर्वच शेतकऱ्यांना हा व्यवसाय सुरू करता येणे अशक्य आहे.

मात्र शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन आता शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. यासोबतच नाबार्ड सारख्या काही संस्था शेतकऱ्यांना यासाठी मदत करत आहेत. डेअरी उद्योजकता विकास या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

यामुळे या कर्जाच्या मदतीने आता शेतकऱ्यांना हा व्यवसाय सुरू करता येणार आहे आणि आपल्या व्यवसायाची पायाभरणी करून यातून चांगली कमाई करता येणे शक्य होणार आहे. दरम्यान आज आपण नाबार्ड कडून नेमकं किती कर्ज मिळतं, यावर काही अनुदान मिळतं का? तसेच नेमकं कर्ज कशासाठी मिळतं याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- पंजाबराव डख : 2023 चा मान्सून कसा राहणार? केव्हा होणार पावसाचं आगमन, कधी होणार पेरण्या?, डख यांनी सांगितली सविस्तर…

नाबार्डकडून कशासाठी मिळत कर्ज 

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, डेअरी उद्योजकता विकास या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना पशुधन खेरदी, मिल्किंग मशिन, डेअरी प्रोसेसिंग युनिट, वाहतूक, शीतगृह आणि डेअरी मार्केटींग आऊटलेट यासारख्या बाबींसाठी कर्ज दिले जाते. यामुळे पशुपालक शेतकरी बांधव आपल्या गरजेनुसार योजनेअंतर्गत कर्ज घेऊन आपला व्यवसाय करू शकणार आहेत.

किती मिळतं कर्ज?

या योजनेंतर्गत वर नमूद करण्यात आलेल्या बाबींसाठी सहकारी, प्रादेशिक, व्यावसायिक, ग्रामीण किंवा नाबार्ड बँकांकडून कर्ज दिल जात असतं. विशेष बाब म्हणजे या योजनेअंतर्गत डेअरी व्यवसाय अंतर्गत येणाऱ्या वरील बाबींसाठी 7 लाखांपर्यंतचे कर्ज पात्र शेतकऱ्यांना देण्याचे प्रावधान आहे.

अनुदान मिळतं का?

अनेक शेतकऱ्यांकडून आम्हाला याबाबत विचारणा होते की नाबार्ड कडून डेअरी साठी लोन घेतलं तर त्यावर अनुदान मिळतं का. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या कर्जावर शासनाकडून 33.33% इतकं अनुदान देण्याचे प्रावधान आहे.

हे पण वाचा :- दिलासादायक ! अखेर राज्य शासनातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न लागला मार्गी; वाचा सविस्तर

योजनेची वैशिष्ट्ये थोडक्यात?

खरं पाहता ही योजना पशुपालक शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाची आहे. याच्या माध्यमातून पशुपालकांना कर्जही उपलब्ध होतं आणि अनुदान देखील मिळतं यामुळे दुहेरी फायदा शेतकऱ्यांना येथे होतो. या योजनेच्या माध्यमातून किमान 2 जनावरे आणि कमाल 10 जनावर खरेदीसाठी लोन हे मंजूर करून दिल जात. तसेच या योजनेचा लाभ 18 ते 65 वर्षे वयोगटातील शेतकरी घेऊ शकणार आहेत. मात्र योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांकडे जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याची पूर्तता करण्यासाठी जागा असेल अशाच शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.  

कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो याचा लाभ?

आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे याचा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो. तर या योजनेअंतर्गत सर्व भारतीय सामान्य शेतकरी कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहेत. तसेच असंघटित आणि संघटित क्षेत्रातील गट, बचत गट, डेअरी सहकारी संस्था, दूध उत्पादक संघटना, पंचायती राज संस्था देखील या अंतर्गत कर्जासाठी आणि अनुदानासाठी पात्र राहणार आहेत.

कर्ज घेण्यासाठी कुठे संपर्क साधावा?

या योजनेच्या माध्यमातून कर्जाचा लाभ जर शेतकऱ्याला घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना आपल्या जवळील सहकारी, प्रादेशिक, व्यावसायिक, ग्रामीण किंवा नाबार्ड बँकेत यासाठी भेट द्यावी लागणार आहे. बँकेत या कर्जाबाबत संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडे विचारपूस करावी लागणार आहे. यानंतर डेअरी उद्योजकता विकास योजनेंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज सादर करावा लागेल आणि योजनेसाठी आवश्यक तसेच बँकेच्या कामासाठी आवश्यक काही कागदपत्रांची पूर्तता या ठिकाणी करावी लागणार आहे. 

हे पण वाचा :- जुनी पेन्शन योजना : OPS ला नक्षलवाद्यांचे समर्थन; ‘त्या’ बॅनरमुळे पुन्हा जुनी पेन्शन मुद्दा चर्चेत