तुम्हाला देखील 1BHK,2BHK आणि 3BHK फ्लॅट खरेदी करायचा आहे का? तर समजून घ्या वर्गफुटाचे गणित! टाळा फसवणूक

व्यवहारांमध्ये बऱ्याचदा बिल्डरांकडून अनेक बाबतीमध्ये फसवणूक होण्याची शक्यता वाढते. यामध्ये जेव्हा आपण फ्लॅट खरेदी करतो तेव्हा बेकायदा बांधकाम किंवा त्या फ्लॅटचे जे काही वर्गफूट म्हणजेच एकूण एरिया आहे यामध्ये देखील काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात व ग्राहकांची फसवणूक होते.

Ajay Patil
Published:

स्वतःची मालमत्ता म्हणजेच फ्लॅट किंवा प्लॉट किंवा एखादी जमीन खरेदी करणे म्हणजे आता पाहिजे तेवढे सोपे राहिलेले नाही. कारण मालमत्तांच्या किमतींमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने अशा प्रकारची मालमत्ता खरेदी करण्या अगोदर दहा वेळा विचार करणे खूप गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा आपण होम लोन किंवा इतर प्रकारचे कर्ज काढतो व अशा प्रकारच्या मालमत्ता खरेदी करत असतो.

परंतु अशा व्यवहारांमध्ये बऱ्याचदा बिल्डरांकडून अनेक बाबतीमध्ये फसवणूक होण्याची शक्यता वाढते. यामध्ये जेव्हा आपण फ्लॅट खरेदी करतो तेव्हा बेकायदा बांधकाम किंवा त्या फ्लॅटचे जे काही वर्गफूट म्हणजेच एकूण एरिया आहे यामध्ये देखील काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात व ग्राहकांची फसवणूक होते.

त्यामुळे तुम्ही वन बीएचके किंवा टू बीएचके फ्लॅट विकत घेणार असाल तर ते किती क्षेत्रफळात बांधलेले असतात इत्यादीची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. तसेच वन बीएचके, टू बीएचके आणि तीन बीएचके फ्लॅटचे मॉडेल नेमके कसे असते? याबद्दलची माहिती देखील तुम्हाला असणे खूप गरजेचे आहे.

 विविध फ्लॅटबद्दल जाणून घ्या माहिती

1- वन बीएचके फ्लॅट जेव्हा तुम्ही वन बीएचके फ्लॅट खरेदी कराल तेव्हा त्याचे मॉडेल जर बघितले तर यामध्ये स्टॅंडर्ड आकारामध्ये बनवलेला एक बेडरूम, एक हॉल आणि किचन असते. वन बीएचके फ्लॅटचे जर आपण साधारणपणे क्षेत्रफळ बघितले तर ते 400 ते 500 वर्ग फुटामध्ये असते.

सामान्य नागरिकांसाठी वन बीएचके फ्लॅट खरेदी करणे आजकालच्या कालावधीत एक उत्तम पर्याय आहे. जर तुमचा बजेट थोडा जास्त असेल तर तुम्ही 1.5 बीएचके अपार्टमेंट खरेदी करू शकतात.यामध्ये दोन रूम असतात व सोबत स्टॅंडर्ड आकाराचा मास्टर बेडरूम देखील असतो. तसेच दुसरा बेडरूम स्टॅंडर्ड आकारापेक्षा थोडा जास्त आकाराचा असतो.

2- टू बीएचके फ्लॅट टू बीएचके फ्लॅट मध्ये एका युनिटचा विचार केला तर यामध्ये दोन बेडरूम, एक हॉल आणि एक किचन  असते. या प्रकारच्या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम मध्ये अटॅच टॉयलेट आणि रूमच्या बाहेर गेस्ट वॉशरूम असते. टू बीएचके फ्लॅट प्रामुख्याने छोटी मुले असणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो.

टू बीएचके मध्ये वन बीएचके पेक्षा जास्त जागा असते. तसेच तुमचा बजेट जास्त असेल तर तुम्ही 2.5 बीएचके फ्लॅट खरेदी करू शकतात व यामध्ये दोन मास्टर बेडरूम, एक छोटा रूम, एक लिविंग रूम आणि एक किचन असते व याचे क्षेत्रफळ 950 वर्गफुटांपेक्षा जास्त असते.

3- तीन बीएचके फ्लॅट तीन बीएचके फ्लॅटमध्ये तीन बेडरूम, एक हॉल आणि एक किचन असते व सध्या मुंबई आणि दिल्ली सारख्या तसेच इतर शहरांमध्ये थ्री बीएचके फ्लॅट खरेदी करण्याचा ट्रेंड वाढताना दिसून येत आहे.

बीएचके फ्लॅट मध्ये तीन वाशरूमचे सेट असतात व यापैकी दोन्ही रूमला दोन वाशरूम अटॅच असतात व तिसरा वाशरूम हा गेस्ट वॉशरूम असतो व तो बाहेरच्या बाजूला असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe