तुमच्याही घरामध्ये डासांचे प्रमाण खूपच वाढते का? फक्त अंगणात किंवा बाल्कनीत ‘ही’ झाडे लावा; बघा डास कसे होतात गायब!

डासांमुळे बऱ्याचदा आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात व मलेरिया तसेच चिकनगुनिया, डेंग्यू सारखे आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे घराची स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे असते. घराचे स्वच्छता कितीही ठेवली तरी देखील घरामध्ये डासांचा प्रादुर्भाव हा आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो.

Ajay Patil
Published:
mosquito

Tips For Mosquito Control From Home:- घराच्या आणि घराच्या सभोवतालची स्वच्छता ज्याप्रमाणे घराची सुंदरता किंवा आकर्षकपणा वाढवते. अगदी त्याचप्रमाणे घराची स्वच्छता आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील खूपच महत्त्वाची असते. आपल्याला माहित आहे की घरामध्ये देखील झुरळ, पाली तसेच लाल मुंग्यांसारखे बारीक कीटक देखील खूप त्रासदायक ठरतात.

तसेच अडगळीच्या ठिकाणी उंदरांचा प्रादुर्भाव देखील घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो व अशा प्रकारच्या या लहान प्राण्यांमुळे मात्र आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात किंवा घरातील उपयोगी वस्तूंचे खूप मोठे नुकसान होते. परंतु यामध्ये सगळ्यात उपद्रवी असतील तर ते म्हणजे डास होय.

डासांमुळे बऱ्याचदा आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात व मलेरिया तसेच चिकनगुनिया, डेंग्यू सारखे आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे घराची स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे असते. घराचे स्वच्छता कितीही ठेवली तरी देखील घरामध्ये डासांचा प्रादुर्भाव हा आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो.

खास करून आता हिवाळ्याची सुरुवात होत आहे व आता या सुरुवातीला बऱ्याच घरांमध्ये डासांचे प्रमाण वाढल्याचे बऱ्याच जणांचे अनुभवाला आले असेल. कारण हवामान बदलामुळे डासांची संख्या देखील वाढू शकते.

त्यामुळे घरातील डासांचा त्रास कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात व बाजारातून मॉस्किटो किलर सारख्या उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

परंतु यामध्ये विविध प्रकारच्या केमिकलचा वापर केला असल्याने ते आरोग्याला घातक देखील ठरू शकतात. त्यामुळे नैसर्गिक उपायांनी डासांचा प्रतिबंध करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे या लेखात आपण अशी काही महत्त्वाच्या झाडांची माहिती घेणार आहोत ज्यांची लागवड तुम्ही घराच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीत केली तर डासांना दूर पळवण्यासाठी ते फायद्याचे ठरतात.

घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत लावा ‘ही’ रोपे आणि पळवा डासांना

1- तुळस- साधारणपणे प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावनामध्ये तुळस ही वनस्पती लावलेली असते. अध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील तुळस ही वनस्पती खूप महत्त्वाची आहे.

परंतु डासांपासून संरक्षण करण्यासाठी देखील तुळस ही एक महत्त्वाची वनस्पती म्हणून ओळखली जाते. तिचे रोप जर घराजवळ असेल तर डास घरात येत नाहीत.

2- झेंडूच्या फुलांची लागवड- झेंडूच्या फुलांची लागवड जर घराच्या अवतीभवती किंवा घरामध्ये केली तर डासांना घरात येण्यासाठी अटकाव होतो. कारण झेंडूच्या फुलांचा वास हा डासांना खूप हानिकारक समजला जातो.

झेंडूच्या फुलांच्या वनस्पतींमध्ये पायरेथरम,सॅपोनिन आणि स्कोपोलेटीन यासारखे घटक असतात व डासांना दूर ठेवण्यासाठी हे घटक कारणीभूत ठरतात. त्यामुळे घरात किंवा बाल्कनीत झेंडूच्या फुलांचे रोपे लावल्यास डासाचा प्रादुर्भाव कमी होतो.

3- पुदिना- पुदिना आपल्याला सगळ्यांना माहित आहे व याचा जो काही वास असतो तो देखील डासांना सहन होत नाही व घरामध्ये जर पुदिन्याचे रोपटे असेल तरी डास घरापासून दूर राहतात. तसेच पुदिन्याची पाने चिरडून ते त्वचेवर लावले तरी डास चावत नाहीत.तेव्हा पुदिन्याच्या तेल जर पाण्यामध्ये मिसळून ते घरामध्ये फवारले तरी डास दूर राहतात.

4- गुल मेहंदी- गुल मेहंदीच्या वासामुळे देखील डास घरापासून दूर पळतात. गुलमेहंदीचे फुल पाण्यामध्ये भिजवून ते पाणी घरात फवारले तरी डासच नाहीतर माशादेखील येत नाहीत. अशाप्रकारे गुल मेहंदी रोपटे देखील डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी फायद्याचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe