Munawar Faruqui : प्रसिद्ध कॉमेडी युटूबर मुनवर फारुकी YouTube , Instagram वरून कमावतो करोडो रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Munawar Faruqui : सध्याचा सोशल मीडियाचा जमाना आहे. करमणुकीची साधने देखील बदलली आहे. टीव्ही, सिरियल्स आदींची जागा आता फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामने घेतली आहे.

आज देशभरात बहुतांश लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. लहान मुलांसापासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत याची आता क्रेझ आहे.

परंतु तुम्हा हे माहित आहे का की तुम्ही ज्याला करमणूक म्हणता त्यातून अनेक लोक करोडो रुपये कमावत आहे. मुनवर फारुकी याच्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच. स्टँड अप कॉमेडी करण्यासाठी हा प्रसिद्ध आहे. पण तो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत.

त्याचे नेमके किती उत्पन्न आहे? तो कुठून आणि किती रुपये कमावतो? याबदल आपण जाणून घेऊयात –

मुनवर फारुकी यांचा अल्प परिचय

28 जानेवारी 1992 रोजी गुजरात राज्यातील जुनागढ शहरात जन्मलेल्या मुनवर फारुकी यांचा स्टँडअप कॉमेडियन, YouTuber म्हणून नावलौकिक आहे. त्यांच्या कॉमेडी सिन मुळे ते भारतभर प्रसिद्ध आहेत. लोकांना हसवण्याच्या त्याच्या टॅलेंटमुळे आज मुनावर सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाला आहे.

युट्युब मधून किती कमवतात

मुनवर फारुकी हे त्यांचे कॉमेडी व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकत असतात. लोकांना ते प्रचंड आवडतात. त्यांच्या चॅनेलचे जवळपास 4 मिलियन पेक्षा जास्त सब्सक्राइबर आहेत. ते त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून दरमहा सुमारे 2 ते 3 लाख रुपये कमावतात.

स्पॉन्सरशिप मधून वेगळंच इन्कम

त्यांच्या या यूट्यूब चॅनेलवर 4 मिलियन पेक्षा अधिक अधिक Subscribers आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या जाहिराती करण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधतात. एका रिपोर्टनुसार, मुनवर फारुकी त्याच्या यूट्यूब चॅनलवर ब्रँडची जाहिरात करण्यासाठी 8 ते 10 लाख रुपये घेतात.

मुनवर यांची इंस्टाग्राम मधून होते लाखोंची कमाई

मुनवर यांचे इन्स्टा वर देखील 7 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर आहेत. ते आपल्या अकाऊंटवरून एक स्पॉन्सर पोस्ट करण्यासाठी साधारण 2 ते 3 लाख रुपये घेतात. महिन्याला ते यातून 5 ते 6 लाख रुपये कमावतात.

इतर कमाई

विविध भागात ते स्टॅन्ड अप कॉमेडीसह कार्यक्रम करतात. सध्या ते बिग बॉस मध्ये देखील आले आहेत. एकंदरीतच त्यांची इतर कमाई देखील लाखो रुपयांत आहे.