व्यक्तीचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला किंवा कोणत्या जातीत झाला याला महत्त्व नसते. परंतु त्या व्यक्तीचे कार्यकर्तृत्व कसे आहे? समोरील व्यक्तीची कष्ट करण्याची जिद्द आणि समोर ठेवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी इत्यादी गुणांकडे व्यक्ती सर्वोत्तम ठरते. या सगळ्या यशामध्ये व्यक्तीचे काही उपजत गुण कौशल्य महत्त्वाची असतातच परंतु आपण ठरवलेले ध्येय तडीस नेण्याकरिता केलेले प्लॅनिंग व त्या प्लॅनिंग नुसार केलेले कष्ट आणि नियोजन खूप महत्त्वाचे ठरते.
याच पद्धतीने जर आपण नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या सरसम या गावच्या शेतकरी कन्या पूजा रविकांत कलाने त्यांची यशोगाथा पाहिली तर प्रचंड मेहनत आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी थेट युरोपमधील बेल्जियम या देशातील कॉग्नीझट कंपनीमध्ये वरिष्ठ इंजिनिअर या पदावर भरारी घेत 70 लाख रुपयांचे पॅकेज मिळवले आहे.
शेतकऱ्याच्या मुलीने मिळवले सत्तर लाखाचे पॅकेज
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या सरसम या गावचे दिवंगत शेतकरी प्रकाशराव वानखेडे यांचे सुकन्या पूजा रविकांत कलाने त्यांनी मेहनत व अभ्यासाच्या जोरावर थेट युरोप मधील बेल्जियम या ठिकाणी असलेल्या कॉग्नीझट या कंपनीमध्ये वरिष्ठ इंजिनियर या पदाला गवसणी घातली असून चक्क 70 लाख रुपयांचे पॅकेज कंपनीकडून पूजा यांना देण्यात आले आहे.
पूजा या उपसरपंच एडवोकेट अतुल प्रकाश वानखेडे यांच्या भगिनी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका असलेल्या शिलाबाई वानखेडे यांची कन्या आहेत. जर पूजा यांचे शिक्षण पाहिले तर त्यांनी आयटी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी पूर्ण केले. पूजा या हिमायतनगर तालुक्यातील पहिली महिला शेतकरी कन्या प्रगत राष्ट्रांमध्ये उच्च अशा पदावर विराजमान झाले असून त्यांचे सासरकडील पंडितराव कलाने यांनी देखील त्यांना यासाठी खूप मोठे प्रोत्साहन दिले.
अशा पद्धतीने त्यांना मिळाली बेल्जियम या ठिकाणी नोकरी
पूजा कलाने ह्या पुणे या ठिकाणी कॉग्नीझट या कंपनीमध्ये चांगले पॅकेजेच्या नोकरीवर होत्या. या ठिकाणी असलेले त्यांचे कामातील चुणूक आणि उत्कृष्टता पाहून त्यांना कॉग्नीझट या कंपनीने थेट युरोप खंडात असलेले प्रगत राष्ट्र बेल्जियम या ठिकाणी उच्च पदावर नियुक्ती दिली व थेट सत्तर लाखांचे पॅकेज देऊ केले.
नवीन नोकरीच्या ठिकाणी रुजु होण्यासाठी पूजा या दोन सप्टेंबर रोजी रवाना झाल्या. अशा पद्धतीने एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलीने थेट युरोपातील प्रगत अशा बेल्जियम या ठिकाणी भरारी घेतल्यामुळे सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक केले जात आहे.
अशा पद्धतीने अभ्यास आणि कष्ट करण्याची तयारी राहिली तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात हे पूजा यांनी सिद्ध करून दाखवले.