अरे वा…! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान ; वाचा सविस्तर

Farmer Scheme : देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्षपणे तसेच अप्रत्यक्षपणे शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत देशातील शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी कायमच केंद्र तसेच राज्य सरकारकडून वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित केल्या जातात. अशातच केंद्राद्वारे ड्रोन खरेदीसाठी देखील एक योजना चालवली जात आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंतचे ड्रोन खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांना जवळपास अडीच लाखांपर्यंतच अनुदान उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात आली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामध्ये महाराष्ट्रातील कोकण विभागासाठी रत्नागिरी या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. खरं पाहता पारंपारिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागते. यामध्ये उत्पादन खर्च देखील अधिक येतो. मात्र आधुनिक पद्धतीने शेती केली तर शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते.

सुरुवातीला अधिक खर्च करावा लागतो मात्र यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अलीकडे वाढत असून जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि तंत्राचा वापर करण्याचा सल्ला देत आहेत. ड्रोन हे देखील असच एक आधुनिक तंत्रज्ञान आहे, याचा वापर करून शेतीमध्ये फवारणी करण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे ड्रोनचा उपयोग करून शेतकरी बांधवांना कमी वेळेत फवारणी करता येईल, ज्या ठिकाणी मॅन्युअली फवारणी करता येणे अशक्य आहे अशा ठिकाणी फवारणी करता येईल. विशेषता उसाच्या शेतात फवारणीसाठी याचा सर्वाधिक उपयोग होणार असून याचा मोठा फायदा देखील शेतकऱ्यांना होणार आहे.

यामध्ये असलेले विशेष तंत्रज्ञान नेमक्या शेतातील कोणत्या भागात रोगाचा किंवा कीटकांचा प्रादुर्भाव आहे हे शोधण्यास मदत करणार आहे. नवीन तंत्रज्ञानावर आधारित असलेले हे कृषी ड्रोन तन, संक्रमण आणि कीटकांमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून त्याची माहिती शेतकऱ्यांना देईल यामुळे शेतकऱ्यांना आपले पीक वाचवण्यासाठी मेहनत घेता येणार आहे.

एवढेच नाही तर आता असे कृषी ड्रोन आले आहेत जे पिकांमध्ये कोणत्या पोषक घटकांची कमतरता आहे हे देखील ओळखू शकणार आहेत. पाणी नियोजन करण्यासाठी देखील ड्रोनचा वापर करता येणे शक्य आहे. एकंदरीत जर विचार केला तर कृषी ड्रोन हे शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध होणार आहे.

मात्र कृषी ड्रोन हे महागडे असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ घेणे कठीण आहे. यामुळे याचा लाभ गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळावा म्हणून शासनाने ही योजना कार्यान्वित केली आहे. दरम्यान कोकणात यासाठी प्रशिक्षण केंद्र रत्नागिरी किंवा सावंतवाडी या ठिकाणी दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू होणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले आहे.