कष्टाचं चीज झालं ! शेतकरी पुत्राचा एमपीएससीत वाजला डंका ; बनला आरटीओ इन्स्पेक्टर

Farmer Son Became RTO Inspector : शेतकरी पुत्र आता कोणत्याच कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेला नाही. शेतीसोबतच शिक्षण, व्यवसाय, राजकारण, समाजकारण इत्यादी क्षेत्रात शेतकरी पुत्रांनी आपला ठसा उमटवला आहे. शिक्षणात तर शेतकरी पुत्रांनी अलीकडे मोठी नेत्र दीपक अशी कामगिरी केली आहे. एवढेच नाही तर देशातील सर्वात कठीणतम परीक्षांपैकी एक असलेल्या एमपीएससी परीक्षेत देखील अलीकडे शेतकरी पुत्रांचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या लेकाने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत आरटीओ इन्स्पेक्टर बनण्याचा बहुमान पटकावला आहे. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे जयपूर येथील अमर रामेश्वर पायघन यांनी एमपीएससी परीक्षेत यश संपादित करत आरटीओ हे पद प्राप्त केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे सध्या अमर यांच्यावर चहूबाजूने कौतुकाचा वर्षाव होत आहे. अमर यांचे वडील रामेश्वर शंकर पायघन आणि त्यांचे बंधू प्रकाश हे शेतकरी आहेत. दोघेही एकत्रच राहतात आणि त्यांच्याकडे 40 एकर एवढी शेत जमीन आहे. रामेश्वर यांना एकूण तीन अपत्य, यात दोन मुले आणि एक मुलगी. मुलगीच लग्न झाला आहे. तर एक मुलगा बीएएमएसचे शिक्षण घेत आहे आहे आणि आता अमर आरटीओ झाला आहे.

विशेष म्हणजे प्रकाश शंकर पायघन यांना देखील एकूण तीन अपत्य असून दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलींचे लग्न झाले आहे आणि मुलगा बीएएमएसचे शिक्षण घेत आहे. निश्चितच शेतीची पार्श्वभूमी असूनही या कुटुंबांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देऊन शिक्षणाचे महत्व अधोरेखित केल आहे. दरम्यान या कुटुंबातून एक मुलगा आरटीओ झाला असल्याने सध्या पंचक्रोशीत या कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अमर यांच्याबाबत बोलायचं झालं तर पहिले ते आठवीचे शिक्षण त्यांनी आपल्या गावातच केलं. दरम्यान दहावी आणि बारावीच्या शिक्षणासाठी ते रिसोड येथे होते. यानंतर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी आणि एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी पुणे गाठले. पुण्यात त्यांनी 2020 साली एमपीएससीची परीक्षा दिली.

या 2020 साली दिलेल्या परीक्षेत त्याने यश संपादित केले असून त्याची आता आरटीओ या पदावर वर्णी लागली आहे. निश्चितच शेतकरी कुटुंबातून येत अन एमपीएससीत चांगली नेत्र दीपक अशी कामगिरी करत या शेतकऱ्याच्या लेकानं अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या परिवाराच, आपल्या गावाच नाव रोशन केलं आहे.