Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

कौतुकास्पद ! उच्चशिक्षित तरुणाने नोकरी न करता सुरू केली शेती; उन्हाळी हंगामात बाजरीच्या पिकातून मिळवले तब्बल पाच लाखाचे उत्पन्न

Farmer Success Story : गेल्या काही दशकात शेतीमध्ये मोठा बदल झाला आहे. आता पारंपारिक पिकांऐवजी नगदी पिकांना शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. मात्र काही शेतकरी आपल्या शेतीच्या कसबेतून पारंपारिक पिकांमधून देखील चांगली कमाई करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बीड जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील उन्हाळी हंगामात बाजरी शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. बाजरीचे पीक एक पारंपारिक पीक आहे. या पिकाची शेती काळाच्या ओघात कमी प्रमाणात केली जात आहे.

बाजरीच्या पिकातून अपेक्षित अशी कमाई होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता इतर नगदी पिकांची तसेच फळबाग पिकांची शेती सुरू केली आहे. मात्र बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या केजडी नदीच्या काठावर वसलेल्या धनराज बबन जाधवर या प्रयोगशील शेतकऱ्याने बाजरीच्या शेतीतून लाखोंची कमाई करून दाखवली आहे.

हे पण वाचा :- महिलांसाठी आनंदाची बातमी ! आता महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार ‘इतकं’ कर्ज, शासनाने सुरू केली विशेष योजना, पहा…..

जाधवर यांनी उन्हाळी हंगामात आपल्या पाच एकरात उन्हाळी बाजरी लावली. त्यांनी निर्मल सीड चे बाजरी बियाणे वापरले. बाजरीची पेरणी केल्यानंतर त्यांनी वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी विशेष कष्ट मात्र घेतलेत.

आणि उन्हाळी हंगामात कमी पाण्याचा वापर करून त्यांनी बाजरीची शेती यशस्वी करून दाखवली आहे. कमी पाण्यात शिवाय कमी खर्चात त्यांना बाजरीच्या पिकातून पाच लाखाची कमाई झाली आहे.

जाधवर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना 19 हजार रुपये इतका खर्च बाजरी पीक उत्पादित करण्यासाठी आला आहे. म्हणजेच त्यांना चार लाख 80 हजाराचा निव्वळ नफा बाजरीच्या पिकातून मिळणार आहे.

एकीकडे नगदी पिकाच्या लागवडीतून देखील शेतकऱ्यांना अपेक्षित अशी कमाई होत नसताना जाधवर यांनी उन्हाळी हंगामात बाजरी लागवडीचा प्रयोग करून लाखो रुपयांची कमाई करत इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा मुंबईत; ठाणे ते पश्चिम उपनगरातील ‘या’ शहराच अंतर फक्त 15 मिनिटात होणार पार, पहा….

विशेष बाब अशी की जाधवर यांनी एम ए बी एड पर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र शिक्षणानंतर नोकरी मागे न लागता त्यांनी शेती व्यवसायात आपल करिअर घडवण्याचा ठरवलं.

आता त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या बाजरीच्या पिकातून त्यांना तब्बल पाच लाखांची कमाई झाली आहे.

यामुळे सध्या त्यांच्या या प्रयोगाची भुरळ इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील पडले आहे. एकंदरीत जर योग्य नियोजन केलं तर पारंपारिक पिकाच्या शेतीमधून देखील लाखो रुपयांची कमाई होऊ शकते हेच या प्रयोगातून आज सिद्ध झाले आहे.

हे पण वाचा :- पंजाब डख : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; मे अन जून महिन्यात कसं राहणार हवामान? वाचा डख यांचा सविस्तर हवामान अंदाज