Farmer Success Story : अलीकडे शेतीऐवजी नोकरीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. याच महत्त्वाचा कारण म्हणजे बागायतदार तरुणांना आता लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलगा शेती करतो म्हटलं की लोक नाक मुरडतात.
तरुण शेतकरी लग्नाळू मुलांना मुली मिळत नसल्याने शेती ऐवजी नोकरी किंवा उद्योगधंद्यात मुलं आपलं नशीब आजमावत आहेत. नोकरीमध्ये मन रमत नसतांनाही नोकरी करत आहेत. पण काही तरुण शेतकरीपुत्रांनी मात्र शेतीमध्येच नवनवीन प्रयोग करत शेती व्यवसाय फायदेशीर करून दाखवला आहे.
विशेष म्हणजे काही तरुण नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेती करू लागले आहेत. नांदेड जिल्ह्यातुनही असच एक उत्तम उदाहरण समोर आल आहे. जिल्ह्यातील एका इंजिनियर दांपत्याने नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेतीमध्ये आपलं नशीब आजमावला आहे. विशेष म्हणजे यामध्ये हे शेतकरी दांपत्य यशस्वी ठरले असून शेवग्याच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
हे पण वाचा :- मुंबईतल्या घराचं स्वप्न म्हाडाकडून होणार पूर्ण ! Mhada च्या 4 हजार 83 घरांच्या लॉटरीची A टू Z माहिती वाचा एका क्लिकवर
गुलाब पावडे आणि त्यांची धर्मपत्नी मंजुषा पावडे यांनी आयटी क्षेत्रातील इंजिनियरची नोकरी सोडून शेवगा शेती करून शेवग्याच्या पाल्यापासून पावडर तयार करत नवीन व्यवसाय थाटला आहे. गुलाब पावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पुणे आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये तब्बल 15 वर्ष नोकरी केली आहे.
त्यांना महिन्याला दोन लाखाचं पेमेंट होतं तसेच त्यांच्या धर्मपत्नीला महिन्याला दीड लाखाचे पेमेंट मिळत होतं. मात्र नोकरीमध्ये मन रमत नसल्याने त्यांनी नोकरीं सोडण्याचा निर्णय घेतला आणि हैदराबाद मध्ये असतानाच शेवगा शेती संदर्भात माहिती जमवली.
यानंतर त्यांनी 2018 मध्ये नोकरी सोडली आणि गावी परतत शेती करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे वडीलोपार्जित दहा एकर जमीन होती यामध्ये त्यांनी इतर पिक लागवड न करता शेवगा लागवड केली. शेवगा लागवड करताना दोन ओळीत नऊ फुट अंतर ठेवलं. सुरुवातीला त्यांनी शेवग्याच्या शेंगांचे उत्पादन घेतले.
यापासून मात्र त्यांना अपेक्षित अशी कमाई झाली नाही. शेवटी मग त्यांनी शेवग्याच्या पाल्याची पावडर तयार करून विक्री करण्यास सुरुवात केली. या पावडर पासून मात्र त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले.
या पावडरची विक्री 1000 रुपये प्रति किलो या दराने होत असून यापासून त्यांना महिन्याकाठी दीड लाखापर्यंतचे उत्पन्न मिळत आहे.पुणे, मुंबई यांसारख्या महानगरात या पावडरला विशेष मागणी असून या शेवगा पावडर निर्मितीच्या व्यवसायातून त्यांना लाखों रुपयांची कमाई होत आहे.
एकीकडे नवयुवक शेतकरी पुत्र नोकरी मागे धावत आहेत तर दुसरीकडे पावडे दाम्पत्याने शेतीमध्ये जर बदल केला, आधुनिक पद्धतीने शेती केली, बाजारातील मागणी लक्षात घेऊन मूल्यवर्धित उत्पादन तयार केली तर निश्चितच शेती फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध करून दिले आहे. यामुळे सध्या या दामपत्याची पंचक्रोशीत चर्चा पहावयास मिळत आहे.
हे पण वाचा :-शाळा, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आवश्यक डोमिसाईल सर्टिफिकेट कसं काढणार? कोणती कागदपत्रे लागतात? पहा….