Fast Charging Phone:- सध्याचे युग स्मार्टफोनचे युग असून प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन दिसून येतो. कोणतीही व्यक्ती स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करते तेव्हा प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार केला जातो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कमीत कमी बजेटमध्ये कोणता स्मार्टफोन मिळेल? आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे कमी किमतीत आपल्याला महत्त्वाचे वैशिष्ट्ये किंवा फीचर्स कोणत्या स्मार्टफोनमध्ये मिळतील? हे होय.
जर आपण स्मार्टफोनमध्ये असलेल्या फीचर्स च्या बाबतीत पाहिले तर सगळ्यात अगोदर त्या स्मार्टफोनची स्टोरेज कॅपॅसिटी आणि बॅटरी किती टिकते किंवा चार्जिंग व्हायला किती वेळ लागतो? इत्यादी गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो. यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेले स्मार्टफोन हे महत्त्वाचे ठरतात. कारण बऱ्याच लोकांना मोठ्या बॅटरीसह फास्टमध्ये चार्जिंग सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनची आवश्यकता असते.

याप्रकारे तुम्ही जर तीस हजार रुपयांच्या बजेटमध्ये असा स्मार्टफोन शोधत असाल की ज्यामध्ये वेगात चार्जिंग सपोर्ट तसेच मोठी बॅटरी असेल तर या लेखात आपण अशाच काही फोनची यादी बघणार आहोत.
हे स्मार्टफोन होतात फास्ट चार्ज
1- POCO F6- पोको कंपनीचा हा स्मार्टफोन 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन केवळ 32 मिनिटांमध्ये 20 ते 100% पर्यंत चार्ज होतो.
या स्मार्टफोनमध्ये 8s Gen 3 चिपसेट इंस्टॉल करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची स्टोरेज कॅपॅसिटी आठ जीबी+ 256 जीबी स्टोरेज इतकी आहे तर याची किंमत 29 हजार 999 रुपये आहे. याच फोनच्या टॉप व्हेरियंट असलेल्या बारा जीबी+ 512 जीबीची किंमत 33 हजार 999 रुपये आहे.
2- वनप्लस नॉर्ड CE 4 स्मार्टफोन– हा स्मार्टफोन देखील फास्ट चार्जिंगसह तीस हजार रुपये किमतीच्या श्रेणीमध्ये एक उत्तम स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 5500 mAh कपॅसिटीची बॅटरी असून जी 100W चार्जरने चार्ज होते. हा स्मार्टफोन 35 मिनिटांमध्ये वीस ते शंभर टक्के चार्ज होतो व त्याचे आठ जीबी+ 128 जीबी युनिटची किंमत 24999 रुपये आहेत तर आठ जीबी+ 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 26999 रुपये आहे.
3- ओप्पो F25 प्रो स्मार्टफोन– ओपोचा हा स्मार्टफोन काही महिन्यांपूर्वी बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला आहे व त्याची आठ जीबी+ 128 जीबी वेरियंटची किंमत 24999 रुपये असून याची बॅटरी 5000 mAh आहे व 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनला वीस ते शंभर टक्क्यांपर्यंत चार्ज होण्याकरिता 42 मिनिटांचा कालावधी लागतो.
4- रियलमी 12+ स्मार्टफोन– तुम्ही जर बजेट रेंज मधील स्मार्टफोन शोधत असाल तर रियलमीचा हा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. हा स्मार्टफोन 20% ते 100% चार्ज होण्यासाठी 43 मिनिटांचा कालावधी घेतो. या स्मार्टफोनच्या आठ जीबी+ 128 जीबी व्हेरियंटची किंमत 20999 रुपये आहे तर आठ जीबी+ 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 21999 पर्यंत आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh कॅपॅसिटीची बॅटरी देण्यात आलेली आहे.