Gas Cylinder Subsidy :- आपल्याला माहित आहे की, उज्वला योजनेचे ग्राहक व घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते. यामध्ये जर आपण घरगुती गॅस जोडणीच्या अनुषंगाने बघितले तर केंद्र सरकार प्रति सिलेंडर अनुदान देते व ही अनुदानाची राशी जोडणी असलेल्या ग्राहकांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.
केंद्रातील भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या माध्यमातून उज्वला योजनेसह घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे व हा निर्णय मिळणाऱ्या गॅस अनुदानाशी संबंधित आहे.
नाहीतर होणार गॅस सिलेंडर
वरील अनुदान बंद
केंद्र सरकारच्या भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या माध्यमातून उज्वला योजनेसह घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना ई- केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे व त्यानुसार आता गॅस ग्राहकांना जोडणे असलेल्या गॅस एजन्सी मध्ये जाऊन बायोमेट्रिकची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असणार आहे.
जर ग्राहकांनी बायोमेट्रिक ची प्रक्रिया जर केली नाही तर अशा ग्राहकांना प्रति सिलेंडर मिळणारे अनुदान बंद होणार आहे व या प्रकारचे मेसेज आता संबंधित गॅस एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांना येत आहेत.
ग्राहकाला ई–केवायसी करणे गरजेचे
ज्याच्या नावाने गॅस जोडणी असेल अशा ग्राहकाला ई केवायसी करण्याकरिता संबंधित गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जावे लागणार आहे. त्या ठिकाणी लाभार्थ्यांचा मोबाईल व आधार कार्ड सोबत असणे गरजेचे आहे.
गॅस एजन्सीच्या कार्यालयामध्ये ग्राहकाचा बायोमेट्रिक अंगठा घेऊन एक प्रक्रिया एजन्सीकडून केली जाईल. ग्राहकाला परत जाता येईल व ग्राहकांनी ही प्रक्रिया केली नाही तर ग्राहकाचे गॅस सिलेंडर वितरण व अनुदान देखील बंद होण्याची शक्यता आहे.
एखाद्या ग्राहकाचे यामुळे अनुदान बंद झाले तर….
समजा एखाद्या ग्राहकाने ई केवायसी केली नाही व त्याला मिळणारे अनुदान बंद झाले तर तो संबंधित एजन्सी मध्ये जाऊन ही प्रक्रिया नंतर देखील करू शकणार आहे. या गॅस कंपनीकडून संबंधित ग्राहकाची गॅस जोडणी पुन्हा सुरू करण्यात येईल.
यासोबत ग्राहकांनी त्यांची गॅस जोडणीची सुरक्षा तपासणी देखील करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. ई केवायसी केल्यामुळे जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर तो देखील अपडेट करता येणार आहे व जोडणी धारकाचा मृत्यू झाला असल्यास संबंधित जोडणी दुसऱ्याच्या नावावर देखील करता येणार आहे.
तसेच ग्राहकांना सरकारकडून जे काही अनुदान मिळते त्याचा लाभ घेण्याची इच्छा आहे त्या ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरूनच सिलेंडर रिफिलिंग बुकिंग करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने बुकिंग केल्याशिवाय वितरण करणाऱ्या व्यक्तीकडून सिलेंडर घेऊ नये. अशा पद्धतीने जर सिलेंडर घेतले तर अनुदानाचे नुकसान होऊ शकते.
ग्राहकांना गॅस एजन्सी कडून पाठवण्यात येत आहे हा मेसेज
गॅस ग्राहकांना गॅस एजन्सींकडून मेसेज पाठवण्यात येत असून त्यामध्ये म्हटले आहे की केंद्र सरकार व कंपनीच्या निर्देशानुसार सर्व गॅस ग्राहकांना ई केवायसी करणे गरजेचे आहे व त्याकरिता कृपया आपले गॅस जोडणी कार्ड, ज्याच्या नावाने गॅस जोडणी आहे त्याचे आधार कार्ड घेऊन एजन्सी मध्ये यायचे आहे व स्वतःचा अंगठा लावून प्रक्रिया पूर्ण करावी. जर ही प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही तर भविष्यामध्ये गॅस वितरण व अनुदान बंद होण्याची शक्यता आहे व त्यामुळे ग्राहकांनी सहकार्य करावे असे या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे.