General Knowledge:- भाषा एक असे तंत्र किंवा साधन आहे की ज्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. भाषेचा इतिहास हा खूप मोठा असून भारतामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात व भाषांच्या बाबतीत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला विविधता दिसून येते. प्रत्येक राज्याची राज्यभाषा वेगळ्या आहेत.
परंतु त्या त्या राज्यांमध्ये अनेक स्थानिक नागरिकांच्या देखील वेगवेगळ्या बोलीभाषा आपल्याला दिसून येतात. एकाच भाषेमध्ये देखील अनेक प्रकारचे उपप्रकार पडतात. भाषेच्या बाबतीत एक समृद्ध असा इतिहास असून भारतात जितक्या भाषा बोलल्या जातात तितक्या भाषा जगाच्या पाठीवरील कुठल्या देशात बोलल्या जात असतील असे वाटत नाही.

आपण दररोज जे काही बोलतो त्यामध्ये असे अनेक शब्द असतात की ते आपल्या भाषेशी निगडित नसतात.परंतु आपण त्यांचा उच्चार कायम बोलताना करत असतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर असे अनेक शब्द आपल्या मराठीमध्ये येतात की आपण बोलताना ते उच्चारतो खरे परंतु ते शब्द मराठीत नसून ते प्रामुख्याने इंग्रजी शब्द असतात.
आपल्या बोली भाषेमध्ये हे इंग्रजी शब्द इतके भिनलेले असतात की आपल्याला त्यांचे मराठीत वेगळा अर्थ होतो हे देखील माहिती नसते. असे जर आपण दररोज बोलताना जे इंग्रजी शब्द वापरतो त्याची यादी काढली तर ती खूप मोठी तयार होईल.
या यादीमध्ये आपण एक शब्द जर घेतला आणि त्याचा अर्थ जर आपण मराठीत काय होतो हे जर विचारले किंवा त्याला मराठीत काय म्हणतात? असं जर कोणाला विचारले तर 99% लोकांना सांगता येणार नाही व तो शब्द म्हणजे सिमेंट हा होय. चला तर मग आपण या लेखात बघू की सिमेंट या शब्दाला नेमके मराठीत काय म्हणतात?
सिमेंट या शब्दाला मराठीत काय म्हणतात?
सिमेंट हा शब्द अगदी लहानपणापासून आपण बऱ्याचदा ऐकला असेल. आपल्याला माहित आहे की घराच्या बांधकामासाठी सिमेंटचा वापर केला जातो व हे सिमेंट प्रामुख्याने चुनखडी पासून बनवले जाते. बांधकाम क्षेत्रामध्ये सिमेंट हे खूप महत्त्वाचे असून अगदी अशिक्षित व्यक्ती असू द्यात किंवा लहान मुलगा तो उच्चारताना सिमेंट हा शब्दच विचारतो.
कारण फार पूर्वापार आपण सिमेंटला सिमेंटच म्हणतो. परंतु जर कोणी आपल्याला विचारले तर सिमेंटला मराठीत नेमके काय म्हणतात? तर आपल्याला याचे उत्तर सहजासहजी देता येणार नाही किंवा माहिती तरी नाही. ज्या प्रकारे सिमेंटच्या बाबतीत होते त्याच पद्धतीने दैनंदिन जीवनात आपण अनेक इंग्रजी शब्द वापरतो व त्यांचे अर्थ देखील आपल्याला मराठीत माहीत नसतात.
सिमेंट यापैकी प्रत्येक जणांनी पाहिलेले आहे व त्याचा वापर कुठे केला जातो हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु तुम्हाला जर सिमेंटला मराठीत काय म्हणतात? हे जर कोणी विचारले तर सहजासहजी ते सांगता येणार नाही. कारण सिमेंटला मराठीत जो शब्द वापरला जातो तो मराठीत खूप कमी प्रमाणामध्ये आपण वाचला असेल किंवा ऐकला असेल.
कारण सिमेंटला मराठीत काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे की सिमेंटला मराठी मध्ये वज्रचूर्ण असे म्हटले जाते व सिमेंटसाठी शासकीय व्यवहारांमध्ये हाच मराठी शब्द वापरला जातो.
आता तुम्ही हा शब्द वाचल्यानंतर विचार करा की तुम्ही हा शब्द कितीदा वाचला किंवा त्या अगोदर ऐकला आहे. तर बऱ्याच व्यक्तींचे उत्तर नकारार्थी येईल. त्यामुळे यात लक्षात ठेवण्याची बाब अशी आहे की सिमेंटला मराठी मध्ये वज्रचूर्ण असे म्हटले जाते.