महाराष्ट्र सरकार मुलीच्या जन्म झाल्यावर देते 50 हजार; काय आहे नेमकी ही योजना व कसा घ्यावा लाभ? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
mazhi kanya bhagyashri yojana

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक लाभाच्या योजना राबविण्यात येत असून या योजनांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचे आर्थिक आणि सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातील बऱ्याच योजना या व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत करतात तर काही योजना काही महत्त्वाच्या प्रश्नांच्या संबंधित आहेत व काही शिक्षणाच्या संबंधित देखील आहेत.

या सगळ्या योजनांच्या बाबतीत जर आपण मुलींच्या दृष्टिकोनातून पाहिले तर मुलींच्या करिता देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत. मुलींचा जन्मदर वाढावा तसेच मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता बऱ्याच योजना सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहे.

अशीच एक महत्त्वपूर्ण योजना मुलींच्या उज्वल भविष्याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केले असून तसे पाहायला गेले तर ही योजना 1 जानेवारी 2016 रोजी सुरू करण्यात आलेली होती व या योजनेचे नाव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना होय.

ही एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रत्येक मुलीकरिता 50000 रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून दिली जाते व मुलींना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाते. ही योजना सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

 माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा करावा अर्ज?

याकरिता सर्वात अगोदर अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारच्या प्रशासन विभागाची जी काही अधिकृत वेबसाईट आहे तिला भेट द्यावी लागते. याकरिता अर्ज या वेबसाईटवरून डाऊनलोड करावा आणि काळजीपूर्वक त्याला भरावा.

अर्ज करताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक करू नये. चूक झाली तर अर्ज रद्द होऊ शकतो. अर्ज भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह तो अर्ज महिला आणि बालविकास विभागाकडे जमा करावा.

 कसे आहे या योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे स्वरूप?

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून कुटुंबात मुलीच्या जन्म झाल्यानंतर पन्नास हजार रुपयांची मदत मिळते. यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की या योजनेचा लाभ हा दोन मुली असलेल्या कुटुंबांना घेता येणार आहे. मात्र तिसरी मुलगी जन्माला आल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही

कोणत्याही कुटुंबाला त्यांच्या मुलींचे उज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सहाय्य करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. सोप्या शब्दात सांगायचे म्हटले म्हणजे महाराष्ट्रातील मुलींचे सक्षमीकरण व्हावे यासाठी जे प्रयत्न करण्यात येत आहेत त्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून या माध्यमातून सदर कुटुंबासाठी आर्थिक स्थिरता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत व लैंगिक समानतेला प्रोत्साहन देईल अशी या माध्यमातून अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe