चांगले आणि निरोगी आयुष्य जगणे हे संपूर्णपणे आपल्या हातात असते. कारण आपल्या दैनंदिन ज्या काही सवयी असतात त्यांचा कळत नकळत परिणाम हा आपल्या शरीरावर व मनावर होत असल्याने त्या दृष्टिकोनातून आपण चांगल्या सवयी अंगी बाणवणे खूप गरजेचे असते.
ज्याप्रमाणे निरोगी आयुष्यासाठी किंवा चांगले आरोग्यासाठी संतुलित आहार गरजेचा असतो अगदी त्याचप्रमाणे चांगल्या जीवनासाठी योग्य जीवनशैलीची देखील तितकीच आवश्यकता असते. आजकाल कमी वयामध्ये हार्ट अटॅक किंवा रक्तदाबा सारख्या गंभीर समस्या उद्भवतात त्याच्या मागील मूळ कारणच हे आहे की, संतुलित आहाराची कमतरता आणि बिघडलेली जीवनशैली हे होय.
त्यामुळे जीवनामध्ये जर काही गोष्टींची सवय लावली तर त्यांचा फायदा होतो व चांगल्या आयुष्यासाठी काही वाईट सवयी सोडण्याची देखील तितकेच गरज असते. या अनुषंगाने लेखामध्ये आपण अशा काही महत्त्वाच्या सवयी बघणार आहोत की ज्या अंगी बाणवल्याने तुम्ही निरोगी तसेच दीर्घायुष्य आनंदात जगू शकतात.
शंभर वर्ष निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी या सवयी ठरतील फायद्याच्या
1- सकस व संतुलित आहाराची सवय- जर तुम्हाला देखील निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचे असेल तर तुम्ही सगळ्यात अगोदर तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आरोग्याची सुरुवातच मुळीच आहाराच्या माध्यमातून होत असल्याने संतुलित आहार घेणे खूप गरजेचे असते.
याकरिता तुम्ही आहारामध्ये हिरव्या भाज्या तसेच पातळ प्रथिने, विविध प्रकारचे धान्य आणि फळांचा समावेश किंवा वापर करणे गरजेचे असून त्यामुळे तुम्ही शारीरिक व मानसिक दृष्ट्या देखील निरोगी राहू शकतात. त्यासोबत भरपूर पाणी प्यावे व साखर आणि मीठ कमी खाणे.
रेड मीट म्हणजेच लाल मांसाचे सेवन कमी करावे. प्रक्रिया केलेले आणि जंक फूड तसेच तेलकट व मसाल्याच्या पदार्थांचा वापर खूप मर्यादित प्रमाणे करावा. त्यामुळे आहाराच्या दृष्टिकोनातून ही सवय लावून घेणे खूप गरजेचे आहे.
2- व्यायाम करण्याची सवय- चांगल्या आरोग्यासाठी शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्रिय नसाल तर सांधे तसेच हाडे, स्नायू इत्यादी कमजोर व्हायला लागतात व अशा स्थितीमध्ये 35 व 40 वर्षाच्या वयामध्ये शारीरिक दृष्ट्या खूप कमकुवत वाटायला लागते व हाडांचा त्रास देखील सुरू होतो.
त्यामुळे शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहणे तितकेच गरजेचे आहे व याकरिता दररोज व्यायामाची सवय लावणे महत्त्वाचे आहे. यामध्ये एरोबिक व्यायाम करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने सायकल चालवणे, पायी चालणे, पोहणे, गिर्यारोहण तसेच नृत्य, धावणे इत्यादी दैनंदिन गोष्टींमध्ये समाविष्ट करावे. शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहिल्यामुळे वजन वाढत नाही तसेच स्नायू आणि हाडे देखील मजबूत राहतात. महत्वाचे म्हणजे हृदय व मेंदूचे कार्य योग्यरीतीने चालते व शरीरामधील रक्ताभिसरण देखील व्यवस्थित होण्यास मदत होते.
3- पायऱ्या चढण्याची सवय- जर या विषयाशी संबंधित एक संशोधन पाहिले तर त्यानुसार दररोज पायऱ्या चढल्याने व्यक्तीच्या आयुष्यात वाढ होते असे म्हटले गेले आहे. एवढेच नाही तर पायऱ्या चढल्याने अकाली मृत्यूची शक्यता देखील कमी होते. कारण जेव्हा आपण पायऱ्या चढतो तेव्हा स्नायू सक्रिय होतात व जितके जास्त पायऱ्या तुम्ही चढाल तितके तुम्ही निरोगी राहायला मदत होते.
4- चालण्याची सवय- जर आपण अमेरिकन हार्ट असोसिएशन नुसार बघितले तर तुम्ही दररोज किमान दहा हजार पावले चालणे खूप गरजेचे आहे व यामुळे हृदयविकाराचा धोका 50 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. शरीरातील रक्तदाब व कोलेस्टेरॉल देखील कमी करता येते व रक्ताभिसरण संस्था सुधारते व हृदय देखील निरोगी राहते.
5- धूम्रपानाची सवय टाळा- बऱ्याच जणांना दिवसातून पाच ते दहा सिगरेट सोडायची सवय असते व ही सवय तुमच्या आयुष्य कमी करत असते. धूम्रपान केल्यामुळे फुफुसांचे आणि हृदयाचे नुकसान होते व त्यामुळे जर तुम्ही धूम्रपान केले नाही तर हृदय व फुफुसाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही आणि आयुष्य वाढायला मदत होते. धूम्रपान केल्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया देखील वेगवान होते. त्यामुळे त्वचावर वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसायला लागतात. तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल तर तंबाखू किंवा धुम्रपानाचे सेवन बंद करणे गरजेचे आहे.