Village Of Rich Farmers : डाळिंबाने गावामध्ये आणली आर्थिक सुबत्ता! गावात बांधले टुमदार बंगले, वाचा गेवराईची कथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Village Of Rich Farmers:  पण जेव्हा म्हणतो की ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे. तेव्हा ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकार जेवढे जबाबदार आहे तेवढे जबाबदार हे त्या त्या गावातील नागरिक देखील असतात. जर गावांमध्ये एकी असेल  तर ते गाव समृद्ध होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. म्हणजेच गावाच्या प्रगतीच्या बाबतीत असो किंवा शेती क्षेत्राच्या प्रगतीच्या बाबतीत यामध्ये जर सगळ्यांनी एकी दाखवली तर सगळ्यांसमवेत अख्या गावाचा विकास होतो.

याच तत्वाला अनुसरून जर आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गेवराई या पैठण तालुक्यातील गावाचा विचार केला तर  एकेकाळी मनरेगाच्या कामावर मजुरी करणारे या गावातील शेतकरी आज डाळिंब या फळ पिकामुळे लाखात खेळू लागले आहेत. एक-दोन शेतकरीच नव्हे तर अख्या गावांमध्ये डाळिंब लागवडीने आर्थिक समृद्धी आणली आहे. याच गावाची कहाणी आपण या लेखात बघणार आहोत.

 डाळिंबाने गेवराईत आणली  आर्थिक समृद्धी

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गेवराई हे पैठण तालुक्यातील छोटेसे गाव असून या गावातील शेतकरी मनरेगाच्या कामावर मजूर म्हणून जात होते. परंतु कालांतराने या गावच्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून डाळिंब लागवडीकडे वळण्याचे ठरवले.

आज येथील शेतकरी लाखात खेळत असून शेतकऱ्यांनी गावावामध्ये टुमदार बंगले देखील उभारले आहेत. एवढेच नाही तर अनेकांच्या घरासमोर फोर व्हीलर देखील आहेत. या गावाची ओळख डाळिंबाचे गाव म्हणून आता होत आहे. साधारणपणे 1700 लोकसंख्या असलेले हे गाव व या गावाच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ हे समीकरण नित्याचे होते. या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी  दुष्काळावर मात करत संपूर्ण गावाचीच एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 या पद्धतीने झाली डाळिंब लागवडीची सुरुवात

या गावातील शेतकरी अमोल आगलावे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी पहिल्यांदा डाळिंबाची लागवड पाहिली व 2009 मध्ये गेवराईत पहिल्यांदा डाळिंबाचे लागवड त्यांनी केले.नंतर या पिकाचे महत्त्व ओळखून संपूर्ण गावांमध्ये डाळिंबाची लागवड करायला सुरुवात झाली. या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या होती आणि जमिनी देखील हलक्या असल्यामुळे अनेक शेतकरी डाळिंब लागवडीला हिम्मत करत नव्हते.

परंतु सर्व शेतकरी एकमेकांसोबत आले व हिम्मत करून त्यांनी डाळिंब लागवड केली. परंतु दुष्काळी पट्ट्यात असलेले हे गाव असल्यामुळे पाण्याची टंचाई होती म्हणून अमोल आगलावे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा पर्याय स्वीकारला व कोणी व्यक्तिगत तर काहीजणांनी सामूहिक शेततळी केली. शेततळ्यांमुळे झाले असे की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये देखील संरक्षित पाण्याची उपलब्धता झाली व डाळिंब बागेच्या उत्तम उत्पादनासाठी ते महत्त्वाचे ठरले.

आज या गावाच्या प्रत्येक शेतामध्ये शेततळे असून जवळपास शंभर पेक्षा अधिक शेततळे या गावात आहेत. सध्या 200 एकर  परिसरावर डाळिंबाची लागवड गेवराई मध्ये करण्यात आलेली असून देशातील हैदराबाद आणि दिल्ली तसेच मुंबई यासारख्या  ठिकाणचे  डाळिंब व्यापारी या ठिकाणी येऊन डाळिंबाची खरेदी करतात. शेततळे निर्मिती करताना या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सामूहिक आणि वैयक्तिक शेततळे अनुदानाचा देखील लाभ उठवला व शेततळ्यातील पाण्याचा योग्य पद्धतीने नियोजन केले व डाळिंब शेती यशस्वी केली.