Job News: तुम्ही देखील हॉलीबॉल प्लेअर आहात का? असेल तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे 24 हजार पर्यंत पगार मिळवण्याची संधी, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
bank of maharashtra job

Job News:- बरेच विद्यार्थी-विद्यार्थिनी हे अनेक वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करतात व विविध परीक्षांच्या दृष्टिकोनातून  तयारी करत असतात. यामध्ये यूपीएससी व एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षापासून अनेक प्रवेश परीक्षा, विविध बँकांच्या परीक्षा व रेल्वे भरतीच्या व इतर भरतीच्या परीक्षांची तयारी करत असतात.

अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधी सध्या चालून आल्याचे चित्र आहे. बँकिंग क्षेत्राशी संबंधित असलेल्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी देखील या कालावधीमध्ये अनेक बँकांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.याचप्रमाणे तुम्ही देखील विविध बँकांच्या परीक्षांची तयारी करत असाल

व तुम्ही हॉलीबॉलचे खेळाडू असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून हॉलीबॉल या पदांसाठी भरती सुरू असून याकरिता अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये जे काही 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत ती महिलांसाठी आहेत.

 बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये हॉलीबॉल पदांसाठी महिलांकरिता भरती सुरू

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तुम्हाला हॉलीबॉल खेळायला आवडत असेल किंवा तुम्ही हॉलीबॉल प्लेअर असाल तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये हॉलीबॉल खेळाडूंना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली असून या बँकेच्या माध्यमातून हॉलीबॉल या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली

आहे व ही भरती प्रक्रिया 12 रिक्त पदांसाठी राबवली जात आहे व यामध्ये जे उमेदवार पात्र असतील त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया महिलांसाठी असून ज्या महिला यामध्ये पात्र असतील असे महिला उमेदवारासाठी अर्ज करू शकता.

 काय आहे रिक्त पदाचे नाव?

बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून हॉलीबॉल या पदासाठी असलेल्या 12 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये महिला अर्ज करू शकतात. यासाठी जर आपण आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहिली तर ती पदाच्या आवश्यकतेनुसार आहे व ऑफलाइन पद्धतीने या पदांकरिता अर्ज करायचा आहे.

 किती लागेल वयोमर्यादा?

बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून  हॉलीबॉल या पदाच्या 12 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असतील त्यांचे वय हे किमान 18 ते कमल पंचवीस वर्षे असणे गरजेचे आहे व अशाच उमेदवारांना या भरती प्रक्रिया करिता अर्ज करता येणार आहे.

 निवड झाल्यावर कुठे करावी लागेल नोकरी?

बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या हॉलीबॉल या पदासाठीच्या भरती प्रक्रियेत ज्या उमेदवारांची निवड केली जाईल अशा उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण हे पुणे, महाराष्ट्र असणार आहे.

 अर्ज करण्याची पद्धत अर्ज पाठवण्याचा पत्ता

बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या हॉलीबॉल या पदासाठी रिक्त पदांच्या भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी…

जनरल मॅनेजर, HRM बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”,1501, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.

 काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून हॉलीबॉल या पदाच्या 12 रिक्त जागांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही  8 जुलै 2024 पर्यंत आहे.

 या भरतीच्या अधिक माहितीसाठी या ठिकाणी करा संपर्क

तुम्हाला देखील या भरती प्रक्रियेविषयी अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईट https://bankofmaharashtra.in/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

 निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?

बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या हॉलीबॉल या पदासाठीच्या भरती प्रक्रियेत जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना 24 हजार 50 रुपये इतके वेतन मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe