गुगलला दयावी लागेल 7000 कोटींची भरपाई? काय आहे त्यामागील कारण? वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गुगल म्हटले म्हणजे तुम्हाला जी काही माहिती हवी असेल ती तुम्ही नुसती सर्च बॉक्समध्ये टाईप केले तरी लागलीस तुमच्यासमोर ती माहिती उपलब्ध होते. गुगल हे सर्वाधिक वापरले जाणारे आणि सर्वाधिक पसंतीचे असे सर्च इंजिन असून अगदी ग्रामीण भागातील व्यक्तींना देखील गुगल माहिती आहे. अनेक प्रकारच्या सुविधा गुगलच्या माध्यमातून पुरवल्या जातात. गुगल हे टॉपचे सर्च इंजिन असल्यामुळे अब्जावधी कोटी रुपये अनेक माध्यमातून गुगल कमावते.

त्यातीलच एक म्हणजे तुमचे लोकेशन ट्रॅक करणे याचा देखील यामध्ये समावेश होतो. अगदी तुम्ही काय करत आहात किंवा कुठे थांबला आहात तसेच तुम्ही आता कुठे जात आहात इत्यादी सगळी माहिती गुगल कडे असते. कारण गुगल तुमचे लोकेशन ट्रॅक करत असते. एवढेच काय तुम्ही जे जे काही गुगलवर जाऊन शोधता किंवा बोलता ते देखील ट्रॅक केले जाते व तुम्ही ज्या पद्धतीच्या किंवा ज्या गोष्टींना धरून सर्च करतात अगदी त्याच घटकाशी संबंधित असलेल्या जाहिराती देखील तुम्हाला दाखवल्या जातात.

एवढेच काय जर आपण गुगलचे ट्रेकिंग बंद केले तरी गुगल तुम्हाला ट्रॅक करतच राहते. या सगळ्या माध्यमातून गुगलने आजपर्यंत काही कोटी रुपये कमावले आहेत. परंतु हीच गुगलची ट्रेकिंग सुविधा आता गुगलच्या अंगलट येते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

 गुगलवर नुकताच दाखल करण्यात आला खटला

गुगल जे काही लोकेशन ट्रॅक करते याच बाबतीत गुगलवर एक खटला दाखल करण्यात आला असून या खटल्याच्या माध्यमातून गुगलवर वापरकर्त्यांची दिशाभूल करण्याचा किंवा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये गुगलने कशी आणि कोणकोणत्या ठिकाणी व कोणाकोणाची माहिती व लोकेशन ट्रॅक केले याची संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

एवढेच नाही तर या सोबतच वापरकर्त्यांची दिशाभूल केली त्यामुळे गुगलने 7000 कोटींची भरपाई द्यावी अशी देखील मागणी करण्यात आली होती. हा खटला कॅलिफोर्नियाचे ॲटर्नी जनरल रॉब बोन्टा यांनी दाखल केला होता. यामध्ये गुगलने लोकेशन ट्रेकिंग बंद करण्याचा पर्याय निवडला तर आम्ही लोकेशन ट्रॅक करणार नाही असे सांगून देखील वापरकर्त्यांचे लोकेशन ट्रॅक केले असे आमच्या तपासणी दिसून आले आहे.

या सगळ्या पद्धतीचा गुगल स्वतःच्या व्यवसायासाठी फायदा करून घेत आहे व यामुळेच ते लोकेशन ट्रॅक करणे सुरूच ठेवतात असे देखील या खटल्यात नमूद करण्यात आले आहे. याबाबतीत मिळालेल्या वृत्ताचा विचार केला तर गुगल या सगळ्यांवर सहमत नाही. परंतु गुगलने याबाबतीत सेटलमेंट करण्यासाठी सहमती दर्शवली असून याकरिता $93 दशलक्ष देण्याचे देखील आश्वासन दिले आहे.