Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात झाली मोठी वाढ; कोणत्या राज्यात किती DA? वाचा…

Government Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाकडून महागाई भत्त्याचा लाभ दिला जातो. राज्य शासनाकडून देखील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणजे डीएचा लाभ मिळतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नुकतेच केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के डीए वाढीचा लाभ देण्यात आला आहे. सदरील लाभ जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाला असून आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.

त्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळालेल्या या लाभानंतर अनेक राज्य शासनाकडून त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देखील देण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत आज आपण कोणत्या राज्यात किती महागाई भत्ता राज्य शासनाच्या माध्यमातून तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी वाढवण्यात आला आहे याविषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- रेशन दुकानदाराने रेशन देण्यास नकार दिला किंवा कमी धान्य दिले तर ‘या’ नंबरवर करा तक्रार, कडक कारवाई होणार

कोणत्या राज्यात किती महागाई भत्ता

केंद्रशासनानंतर तामिळनाडू राज्य शासनाने आपल्या राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली आहे. त्यापूर्वी तामिळनाडू राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता या वाढीनंतर तेथील राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.

तामिळनाडू नंतर उत्तर प्रदेश राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना देखील चार टक्के डीए वाढीचा लाभ देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना आता 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.

बिहार राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील चार टक्के दराने महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण; आता मार्गांवर वाहनासह साहित्याची वाहतूक शक्य, प्रवाशांसाठी केव्हा होणार खुला?

याव्यतिरिक्त राजस्थान सरकारने आपल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के एवढी वाढ केली आहे.

आसाम राज्य सरकारने देखील आपल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे.

तसेच हिमाचल प्रदेश राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. तेथील राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना मात्र जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळालेला नाही. सध्या राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये चार टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.

हे पण वाचा :- 12वी पास, पदवीधरांसाठी आनंदाची बातमी! भाभा अनुसंशोधन केंद्रात ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती, आजच करा अर्ज