धक्कादायक ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे वेतन पडणार पुन्हा लांबणीवर ; निधी पडला अपुरा

Government Employee Payment : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी मोठा लढा देत आहेत. कर्मचारी जुनी पेन्शन योजना तसेच महागाई भत्ता लागू करणे यांसारख्या अनेक मुख्य मागण्या लवकरात लवकर शासनाने निकाली काढाव्यात अशी आशा बाळगून आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान आता जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या वेतनाबाबत धक्कादायक माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास 24 जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वेतनासाठी अपुरा निधी प्राप्त झाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षकांच वेतन लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.

यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शिक्षकांनी आता आंदोलनाचा पवित्रा अंगीकारायचं ठरवल आहे. खरं पाहता, यापूर्वी देखील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अपुऱ्या निधीमुळे वेतन वेळेवर मिळालेले नाही. राज्य शासनाने दिवाळीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना वेतन देऊ करण्यासाठी शासन निर्णय जारी केला होता.

Advertisement

मात्र झेडपीच्या शिक्षकांना त्यावेळी देखील दिवाळीपूर्वी वेतन मिळालं नाही. दरम्यान आता सिंधुदुर्ग नागपूर वर्धा आणि भंडारा या चार जिल्ह्यांना वेतनासाठी पूर्ण निधी मिळाला आहे. तर वाशिम जिल्ह्यातील केवळ एका तालुक्यासाठी निधी देण्यात आला आहे. एकंदरीत राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरपासून वेतन मिळालेले नाही.

यामुळे आता प्राथमिक शिक्षक समितीने आंदोलन उभारण्याचे ठरवले आहे. वेतनाव्यतिरिक्त सातवा वेतन आयोगाचीं थकबाकी देखील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना प्राप्त झालेले नाही. हाती आलेल्या माहितीनुसार सातवा वेतन आयोगाचे एकूण दोन हप्ते शिक्षकांना प्राप्त झालेले नाहीत.

या जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनासाठी मिळाला अपुरा निधी:- विदर्भातील वासिम अकोला बुलढाणा गडचिरोली अमरावती गोंदिया यवतमाळ चंद्रपूर मराठवाड्यातील औरंगाबाद बीड हिंगोली लातूर नांदेड जालना यासह एकूण 24 जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनासाठी अपुरा निधी मिळाला आहे. वेतनासाठी शासनाकडून कमी अनुदान मिळाले असल्याने शिक्षकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.

Advertisement