Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

तरुणांसाठी वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल 40 हजार, वाचा सविस्तर

Government Job Maharashtra : राज्यातील लाखो नवयुवक सरकारी नोकरीच्या शोधात असतात. यासाठी तरुण अहोरात्र अभ्यास करत असतात. दरम्यान सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ती म्हणजे चंद्रपूर फॉरेस्ट अकादमी ऑफ एडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट या ठिकाणी काही रिक्त जागा भरण्यासाठी भरती काढण्यात आली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून अभ्यासक्रम संचालक आणि योग प्रशिक्षक या दोन पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे यासाठीचे अतिसूचना देखील जारी झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आज आपण या रिक्त पदाच्या किती जागा भरल्या जाणार आहेत, यासाठी अर्ज कुठे सादर करावा लागणार, अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक, निवड झालेल्या उमेदवारांना किती वेतन मिळणार? यांसारख्या बाबी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ शाळांचे वेळापत्रक बदलणार, 2 सत्रात भरणार शाळा; मंत्री गावित यांची माहिती

कोणत्या आणि किती रिक्त जागांसाठी होणार भरती?

अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार अभ्यासक्रम संचालक आणि योग प्रशिक्षक या पदाच्या प्रत्येकी एक जागा म्हणजेच एकूण दोन रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

योग प्रशिक्षक : या पदासाठी शारीरिक शिक्षणात बॅचलर/मास्टर्स पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. P.T., योग वर्ग, ध्यान आणि सामान्य मूलभूत व्यायाम उमेदवाराला करता येणे अपेक्षित आहे.

अभ्यासक्रम संचालक :- या पदाची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवाराने एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

किती पगार मिळणार

योग प्रशिक्षक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 12000 दर महिना वेतन मिळणार आहे. तसेच अभ्यासक्रम संचालक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दर महिना 40 हजाराचे वेतन मिळणार आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! आता नागपूर ते हैद्राबाद दरम्यान सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस, ‘या’ स्थानकावर राहणार थांबा, गाडीच वेळापत्रक कस राहणार ? पहा…

अर्ज कसा करावा लागणार?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. ओ/ओ. संचालक, चंद्रपूर फॉरेस्ट अकादमी ऑफ प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन, मूल रोड, चंद्रपूर – ४४२४०१ या पत्त्यावर इच्छुक उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

31 मे 2023 पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे. यामुळे इच्छुकांना लवकरात लवकर यासाठी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.

जाहिरात कुठं पाहणार 

https://drive.google.com/file/d/1J0rZgfWvfp2rkOoJsc8-3ZHhzsfsqGXY/view या लिंक वर जाऊन इच्छुक उमेदवारांना या पदभरतीची जाहिरात पाहता येणार आहे. 

हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट ! ‘या’ दिवशी सुरु होणार; कोणत्या स्टेशनवर थांबा घेणार, कस राहणार वेळापत्रक आणि तिकीट दर? वाचा…