Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

4थी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी निघाली भरती, ‘या’ पत्त्यावर आजच पाठवा आपला अर्ज

Government Jobs Maharashtra : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी कमी शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी विशेष खास आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कारण की चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तहसील कार्यालयात रिक्त जागांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयातील कोतवाल या रिक्त पदाच्या भरतीसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

अशा परिस्थितीत आज आपण या पदभरतीच्या माध्यमातून किती रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे, यासाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे, अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक कोणती? याबाबत सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ! शाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार; पण….

कोणत्या जागांसाठी होणार भरती?

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार कोतवाल या रिक्त पदाच्या जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती?

या पदभरतीच्या माध्यमातून कोतवाल पदाच्या सहा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान चौथी उत्तीर्ण असणे जरुरीचे आहे. मात्र शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम अधिसूचना वाचणे जरुरीचे आहे.

हे पण वाचा :- शेवटी तारीख जाहीर झालीच; ‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाचा 12वी चा निकाल, SMS करूनही पाहता येणार निकाल, वाचा….

अर्ज कसा करावा लागणार?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. आस्थापना शाखा, तहसील कार्यालय मूल, जि: चंद्रपूर या पत्त्यावर इच्छुकांनी पात्र उमेदवार आपला अर्ज विहित कालावधीमध्ये सादर करू शकणार आहेत.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज 7 जून 2023 पर्यंत वर नमुद केलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने सादर करता येणार आहे. विहित कालावधीनंतर सादर झालेल्या अर्जावर कोणत्याही परिस्थितीत विचार होणार नाही याची काळजी मात्र उमेदवाराने घ्यायची आहे.

हे पण वाचा :- खरं काय ! समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणेचा महत्त्वाचा टप्पा यावर्षी नाही तर पुढल्या वर्षी ‘या’ महिन्यात होणार सूरू, वाचा….