आनंदाची बातमी ! केंद्र सरकार 20 लाख लोकांना देणार रोजगार, महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न होणार दूर; पहा केंद्राची भन्नाट योजना आहे तरी नेमकी काय?

Government Scheme : आगामी वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. तसेच लोकसभा निवडणूका देखील आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या शासनाकडून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जात आहेत. मोदी सरकारकडून सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हा प्रश्न वर्तमान सरकारसाठी डोकेदुखी सिद्ध होऊ शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच राज्यात विधानसभा निवडणुका राहणार असल्याने हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत देखील वरचढ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र शासनाकडून एका मोठ्या योजनेवर काम सुरू झाले आहे. केंद्र शासन लवकरच 20 लाख लोकांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या रोजगार देणार आहे. यासाठी एका योजनेची पायाभरणी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात नुकतेच एक माहिती दिली आहे.

हे पण वाचा :- बीडच्या शेतकऱ्याचा परफेक्ट कार्यक्रम! ‘या’ जातीच्या दोडक्याची अर्धा एकरावर लागवड केली, तब्बल अडीच लाखांची कमाई झाली, पहा कसं होत नियोजन?

Advertisement

गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मित्र योजना अंतर्गत मेगा टेक्सटाईल पार्क केंद्र शासनाकडून स्थापित होणार आहेत. यासाठी तब्बल 445 कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून दिला जाणार असल्याचे मंत्री महोदयांनी नमूद केल आहे. या मेगा पार्कमुळे वीस लाख लोकांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध होईल असा दावा आहे.

तामिळनाडू, तेलंगाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश मध्ये या टेक्स्टाईल पार्कची स्थापना केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या राज्यात विकसित होणाऱ्यां टेक्स्टाईल पार्क मध्ये 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. ही गुंतवणूक देशातून तसेच विदेशातून देखील होईल. दस्तूर खुद्द पीएम मोदी यांनी याची घोषणा केली होती.

हे पण वाचा :- 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मृत झालेल्या लाभार्थ्याच्या कुटुंबाला मिळणार का? वाचा याविषयी सविस्तर

Advertisement

यानुसार आता वरनमूद केलेल्या सात राज्यांमध्ये हे पार्क स्थापित होणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंतप्रधान मेगा टेक्सटाईल इंटिग्रेटेड टेक्सटाईल अँड अॅपरेल योजना या नावाने ही योजना ओळखली जात आहे. याला ऑक्टोबर 2021 मध्ये मंजुरी मिळाली आहे.

असं सांगितलं जात आहे की या योजनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या टेक्स्टाईल पार्कमुळे सात लाख लोकांना डायरेक्ट रोजगार मिळणार आहे तर 14 लाख लोकांना इनडायरेक्ट रोजगार उपलब्ध होणार आहे. निश्चितच मोदी शासनाची ही योजना देशभरातील लाखो युवकांसाठी फायदेशीर राहणार आहे. ही योजना राज्यातही सुरू होणार असल्याने राज्यातील नवयुवकांना याचा फायदा होईल आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- पंजाबराव डख बोले तैसे ढग हाले ! सोशल मीडियावर चर्चा फक्त पंजाबरावांचीच….

Advertisement