सणासुदीला घ्या कमी किमतीत मिळणारे आणि जबरदस्त वैशिष्ट्ये असलेले दमदार स्मार्टफोन! वाचा स्मार्टफोनची यादी

कुठलाही ग्राहक बाजारामध्ये स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा तो स्मार्टफोनची  निवड करताना कमीत कमी किंमत आणि चांगल्यात चांगली वैशिष्ट्य असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असतो.

Ajay Patil
Published:

भारतामध्ये अलीकडच्या कालावधीत अनेक उत्कृष्ट फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले असून यामध्ये बजेट सोबत प्रीमियम स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये जर उत्तम फीचर्स असलेले स्मार्टफोन हवे असतील तर अनेक पर्याय यामध्ये उपलब्ध झालेले आहेत.

जेव्हा कुठलाही ग्राहक बाजारामध्ये स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा तो स्मार्टफोनची  निवड करताना कमीत कमी किंमत आणि चांगल्यात चांगली वैशिष्ट्य असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असतो. त्यामुळे आपण या लेखामध्ये असे काही स्मार्टफोन बघणार आहोत की ते कमी किमतीतले आहेतच, परंतु उत्तम अशी वैशिष्ट्ये त्यांच्यामध्ये देण्यात आलेली आहेत.

 ही आहेत कमी किमतीत मिळणारे स्मार्टफोन

1- सॅमसंग गॅलेक्सी F05- हा फोन लेदर पॅटर्न डिझाईनमध्ये येतो यामध्ये 50 मेगापिक्सल डुएल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. तसेच या फोनमध्ये मीडिया टेक हेलिओ G85 प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला असून या फोनची रॅम चार जीबी पर्यंत वाढवता येते.

या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा HD+ डिस्प्ले असू शकतो व या फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. या फोनची किंमत 7999 रुपये इतकी आहे.

2-HONOR 200 Lite 5G- हा फोन 108 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल व या फोनमध्ये 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेंसर आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6080 चिपसेट देण्यात आला असून या फोनमध्ये 35W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी देण्यात आलेली आहे.

आठ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 17 हजार 999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन साधारणपणे 27 सप्टेंबर 2024 पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

3- एचएमडी स्कायलाईन हा फोन 108 मेगापिक्सल ऑप्टिकल इमेज स्टॅबिलिझेशन म्हणजेच ओआयएस प्राथमिक कॅमेरा सेंसर सह येतो. तसेच या फोनमध्ये 50 मेगापिक्सल टेलीफोटो लेंस आहे.

तसेच तेरा मेगापिक्सल अल्ट्रा लेन्स आणि 50 मेगापिक्सल ऑटोफोकस सेल्फी कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. या फोनमध्ये 144 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला असून POLED डिस्प्ले आणि HDR हा व्हिडिओ प्लेबॅक उपलब्ध आहे. या फोनच्या 12 जीबी+ 256 जीबी स्टोरेजची किंमत 35 हजार 999 रुपये आहे.

4- लावा ब्लेझ 3 5G- हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 5G चिप्स येतो तसेच ग्लास गोल्ड आणि ग्लास ब्लू या दोन रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे. हा फोन ड्युअल स्टीरीओ स्पीकर आणि नवीन व्हाइब लाईट वैशिष्ट्यांसह येतो. या फोनच्या सहा जीबी रॅम+ 128 जीबी स्टोरेजची किंमत 9999 रुपये आहे.

5- मोटोरोला एज 50 Neo- हा फोन आयपी 68 रेटिंगसह येतो व यामध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर असून जो 3x टेली फोटो कॅमेरा सेन्सरसह येतो. या फोनची आठ जीबी+ 256 जीबी स्टोरेजची किंमत 23 हजार 999 रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe