पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच इथं करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Graduate Government Job 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या तरुणांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे आणि नोकरीच्या शोधात आहेत अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे.

कारण की केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात काही रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नुकतीच अधिसूचना काढण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार मंत्रालयातील रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मात्र आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने विहित कालावधीमध्ये सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- चप्पल घालून टू-व्हीलर चालवल्यास ट्रॅफिक पोलीस दंड आकारतात का? पहा काय सांगतोय वाहतुकीचा नियम

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात प्रोग्रॅम ऑफिसर आणि अकाउंटंट या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अतिरिक्त जागा भरल्या जाणार

प्रोग्रॅम ऑफिसर या पदाची एक रिक्त जागा आणि अकाउंट या पदाची एक रिक्त जागा अशा दोन रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

प्रोग्रॅम ऑफिसर पदासाठी सामाजिक कार्य, समाजशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेले उमेदवार किंवा मान्यप्राप्त विद्यापीठ अथवा संस्थेतून विशेष शिक्षण विषयात एमएड पदवी मिळवलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. यासोबतच उमेदवाराला कम्प्युटरचे विशेषता एमएस वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंटचं सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.

तसेच अकाउंटंट या पदासाठी कॉमर्समधील पदवीधर उमेदवार यासाठी पात्र राहणार आहे. सोबतच उमेदवाराला टॅली, एमएस वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंटच सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :- शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय ! ‘या’ कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना; पहा…

कामाचा अनुभव अन वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील किमान दहा वर्षाचा अनुभव असावा. या पदासाठी किमान 45 आणि कमाल 62 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.

किती पगार मिळणार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 45 हजार ते 60 हजार प्रति महिना वेतन दिल जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज उपलब्ध असून इच्छुक आणि पात्र उमेदवार येथून अर्ज घेऊ शकतात. अर्ज उमेदवाराने काळजीपूर्वक भरल्यानंतर अवर सचिव (धोरण), डिपार्टमेंट ऑफ इम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसएबिलिटी (दिव्यांग), रुम नंबर 520, पाचवा मजला, बी-II विंग, दीनदयाळ अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 110003 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक?

इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज 31 मे 2023 पर्यंत वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवू शकणार आहेत. 

हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावर पुन्हा सुरू झाली वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर