पदवीधर उमेदवारांसाठी खुशखबर; पर्यटन संचालनालयात ‘या’ पदासाठी भरती सुरू, पहा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Graduate Job In Maharashtra : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन संचालनालयात पदभरतीची जाहिरात नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून एकूण सात रिक्त पदे भरली जाणार आहेत.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान आज आपण कोणत्या रिक्त पदांसाठी भरती होणार आहे, तसेच यासाठी अर्ज कुठे पाठवायचा, अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक, आवश्यक शैक्षणिक पात्रता अशी आवश्यक सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- 10वी पास तरुणांसाठी खुशखबर; पुण्यात ‘या’ ठिकाणी आहे नोकरीची संधी, इथे पाठवा अर्ज

कोणत्या पदासाठी होतेय भरती?

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयात प्राचार्य, वरिष्ठ प्राध्यापक तसेच सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या एकूण सात रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक ?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 20 एप्रिल 2023 पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज पाठवता येणार आहे. 

हे पण वाचा :- कलिंगड शेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा; 10 गुंठ्यातला प्रयोग ठरला लाख मोलाचा, पहा ही यशोगाथा

अर्ज कसा करावा लागेल?

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आपला अर्ज पर्यटन संचालनालय नरिमन भवन या ठिकाणी पाठवावा लागणार आहे.

जाहिरात कुठे पाहणार?

या पदभरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, मिळणारे वेतन तसेच इतर महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय भरती 2023 या लिंक वर क्लिक करायचे आहे. 

हे पण वाचा :- पुणे, कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी ! कोकण रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; पहा….