ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विद्यापीठात निघाली भरती, 35 हजार रुपये पगार मिळणार, वाचा….
Graduate Job Maharashtra : पदवीधर असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
विशेषता ज्यांना नासिक मध्ये नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी ही आनंदाचे पर्वणी राहणार आहे. कारण की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.
या विद्यापीठात विविध रिक्त पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे यासाठीची अधिसूचना देखील नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. दरम्यान आज आपण या पद भरती बाबत आवश्यक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी, 12वी रिजल्टबाबत आताची सर्वात मोठी अपडेट ! केव्हा लागणार निकाल? वाचा….
कोणत्या पदासाठी होणार भरती?
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे वरिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी भरती होणार आहे.
किती पदांसाठी होणार भरती?
वरिष्ठ संशोधन फेलो या पदाच्या एकूण दोन रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता?
BAMS पर्यंत शिक्षण झालेल्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच संबंधित कामाचा अनुभव उमेदवाराकडे असणे जरुरीचे राहणार आहे. शैक्षणिक पात्रतेसंदर्भात आणि अनुभवासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मात्र एकदा अधिसूचना वाचावी लागणार आहे.
किती पगार मिळणार?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 35 हजार रुपये महिना एवढं वेतन मिळणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार?
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी-दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक- 422004 या पत्त्यावर उमेदवारांना आपला अर्ज सादर करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक?
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज 9 मे 2023 पर्यंत वर नमूद करण्यात आलेल्या पत्त्यावर सादर करावा लागणार आहे. उमेदवाराने विहित कालावधीमध्ये आपला अर्ज सादर करायचा आहे.
हे पण वाचा :- म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनो सावधान ! ‘ही’ काळजी घ्या नाहीतर होणार लाखों रुपयांची फसवणूक