Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते, कोणता फॉर्मुला वापरला जातो, तुम्हाला किती ग्रॅच्युइटी मिळू शकते? पहा….

Gratuity formula india : भारतात नोकरदारांसाठी सरकारच्या माध्यमातून काही कायदे अस्तित्वात आले आहेत. या कायद्याच्या माध्यमातून नोकरदारांचे आर्थिक हित जोपासले जाते. नोकरदारांना आपल्या कामाच्या मोबदल्यात दरमहा वेतन मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यासोबतच त्यांना काही स्पेशल ट्रीटमेंट कंपनीकडून दिल्या जातात. याव्यतिरिक्त त्यांना ग्रॅच्युइटी म्हणजेच नोकरी सोडताना एक ठराविक रक्कम दिली जाते. ही रक्कम मात्र प्रत्येकचं नोकरदाराला मिळत नाही यासाठी काही नियम आहेत.

सध्याच्या नियमानुसार, ज्या कंपन्यांमध्ये दहापेक्षा अधिक कर्मचारी आहेत अशा कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी दिली जाते. पण अशा कंपनीत एखाद्या नोकरदाराला ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी किमान पाच वर्षे काम करावे लागते. हा कालावधी पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीमधील कर्मचाऱ्याला एक ठराविक रक्कम दिली जाते.

हे पण वाचा :- मुंबईतल्या घराचं स्वप्न म्हाडाकडून होणार पूर्ण ! Mhada च्या 4 हजार 83 घरांच्या लॉटरीची A टू Z माहिती वाचा एका क्लिकवर

ग्रॅच्युइटी हा पेन्शन किंवा भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) भाग नसतो. तर हा कामगाराने कंपनीत ठराविक कालावधीसाठी प्रामाणिकपणे काम केल्याचा पुरस्कार असतो. यासाठी मात्र कामगारांच्या वेतनातून काही ठराविक रक्कम कपात केली जाते आणि कंपनीच्या माध्यमातून या रकमेत आणखी काही रक्कम जोडली जाते.

दरम्यान आज आपण ग्रॅच्यूटीची रक्कम कशी ठरवली जाते? यासाठी कोणता फॉर्मुला वापरला जातो? या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही तुमची ग्रचूटीची रक्कम किती आहे हे कसे तपासू शकता या संदर्भात सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सर्वप्रथम, किती वर्षांची ग्रॅच्युइटी मिळेल यासाठी कामाच्या वर्षाची गणना कशी केली जाते यासंदर्भात जाणून घेऊया. ग्रॅच्युइटीच्या सूत्रानुसार, जर एखादा कर्मचारी 8 वर्षे आणि 8 महिने एका कंपनीत काम करत असेल तर ते 9 वर्षे मानले जाईल. तसेच तो 8 वर्षे आणि 3 महिने काम करत असेल तर ते केवळ 8 वर्षे मानले जाईल.

हे पण वाचा :- तरुणांसाठी खुशखबर ! पोस्टात ‘या’ पदाच्या 15,000 जागेसाठी होणार मेगा भरती; विना परीक्षा थेट 10वी च्या मिरीटवर होणार निवड, आजच इथं अर्ज करा

ग्रॅच्युइटीची रक्कम हा फॉर्मुला वापरून मोजली जाते

एकूण ग्रॅच्युइटी रक्कम = (शेवटचा पगार) x (१५/२६) x (कंपनीत किती वर्ष काम केले). हा फॉर्मुला ग्रॅच्युइटीची रक्कम मोजण्यासाठी वापरला जातो. आता आपण हे एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. जर एखाद्या कर्मचार्‍याने एका कंपनीत बारा वर्षे काम केले आहे आणि त्याचा शेवटचा पगार हा 60,000 रुपये प्रति महिना आहे.

तर अशा कर्मचाऱ्यांची ग्रचूटीची रक्कम (60000)×(15/26)×(12) = चार लाख पंधरा हजार 384 रुपये असेल. या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे ग्रॅच्युईटी म्हणून दिल्या जाणाऱ्या वीस लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर टॅक्स आकारला जात नाही. वीस लाखाच्या पुढे जर ग्रॅच्युईटीची रक्कम असेल तर मात्र टॅक्स द्यावा लागतो.

हे पण वाचा :- शाळा, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आवश्यक डोमिसाईल सर्टिफिकेट कसं काढणार? कोणती कागदपत्रे लागतात? पहा….