Green Tree Python Snake: आंतरराष्ट्रीय बाजारात आहे ‘या’ सापाची कोटीत किंमत! या सापाचे सौंदर्यच आहे त्याच्या मागणीचे कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Green Tree Python Snake:- साप म्हटले म्हणजे आपल्या अंगावर भीतीने रोमांच उभे राहतात. साप या जगातील अशा धोकादायक प्राण्यांपैकी एक असून सापाची प्रत्येकाला भीती वाटत असते. जगामध्ये असे मोजकेच लोक असतील की ज्यांना सापाची भीती अजिबात वाटत नाही. आपल्याला माहित आहे की सापाच्या अनेक प्रजाती आहेत व त्यातील काही प्रजातीच विषारी आहेत बहुसंख्य या बिनविषारी आहेत.

प्रत्येक प्रजातीच्या सापाचे वेगवेगळे असे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे वेगळेपण दिसून येते. अशाच प्रकारे जर आपण सापाच्या एका प्रजातीची माहिती घेतली तर जर एखाद्या व्यक्तीला हा साप सापडला तर संबंधित व्यक्ती करोडपती होऊ शकते. कारण जगामध्ये या सापाची खूप मोठी मागणी आहे व हा साप करोडो रुपयांना विकला जातो. याच सापाविषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.

 ग्रीन ट्री पायथन आहे दुर्मिळ साप

ग्रीन ट्री पायथन ही सापाची सर्वात महाग प्रजात असून या सापाच्या अंगावर असणाऱ्या हिरव्या छटामुळे या सापाचे वेगळेपण दिसून येते व यामुळे तो खूप सुंदर दिसतो. याबाबतचा जर आपण एका अहवालाचा विचार केला तर ग्रीन ट्री पायथन सापाची लांबी अंदाजे दोन मीटर पर्यंत असते व त्याचे वजन दीड ते दोन किलो भरते.

परंतु या प्रजातीच्या सापाची मादी अजगरापेक्षा जास्त वजनाची असू शकते व तिची लांबी नर जातीच्या सापापेक्षा जास्त असते. ही एक सापाची खूप दुर्मिळ अशी प्रजात असून संपूर्ण पृथ्वीतलावर काही ठिकाणीच ही आढळून येते. साधारणपणे इंडोनेशिया, न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमध्येच ग्रीन ट्री पायथन ही सापाची प्रजाती आढळते. तसेच या प्रजातीचा साप झाडांवर राहतो  आणि कीटक व लहान प्राण्यांचे शिकार करून स्वतःचा उदरनिर्वाह करतो.

 ग्रीन ट्री पायथन आहे सर्वात महाग साप

काही रिपोर्टनुसार पाहिले तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ग्रीन ट्री पायथन या प्रजातीच्या सापाची किंमत सुमारे तीन कोटी रुपये इतकी आहे. या सापाचा हिरवा रंग, नाजूक असा पांढरा पॅटर्न आणि विशिष्ट हिऱ्यासारखा डोक्याचा आकार त्याचे आकर्षण जास्त प्रमाणात वाढवतो. या सापाचे सौंदर्य हेच त्याच्या जास्त मागणीला कारणीभूत आहे. त्यामुळेच हा साप एवढ्या मोठ्या किमतीमध्ये विकला जातो. माहितीस्तव विचार केला तर या सापाव्यतिरिक्त एक निळ्या रंगाचा अजगर देखील आहे व तो देखील अत्यंत दुर्मिळ असा साप आहे.