Health Tips :- अनेकजणांना अनेक छोट्या मोठ्या प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असतात व त्यामुळे व्यक्ती खूप प्रमाणात त्रस्त असते. जर आपण छोट्या-मोठ्या समस्या पाहिल्या तर यामध्ये पित्त व त्यालाच आपण ऍसिडिटी असे म्हणतो तर ही एक समस्या खूप सामान्य आरोग्य समस्या आहे.
परंतु यामुळे अगदी दहा ते वीस वयोगटातील मुले देखील त्रस्त असल्याचे आपल्याला दिसून येते. आपल्याला माहित आहे की, ऍसिडिटीमुळे पोटात जळजळ होणे तसेच तोंडात आंबटपणा येणे व छातीत दुखणे इत्यादी अनेक समस्या आपल्याला दिसून येतात. या समस्येपासून आराम मिळवा म्हणून अनेक प्रकारचे औषधे देखील घेतली जातात.
परंतु काही केल्या मात्र यापासून आपल्याला आराम मिळताना दिसून येत नाही. त्यामुळे या समस्येपासून जर पटकन आराम मिळवायचा असेल तर योग्य आहार घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण असे काही अन्नपदार्थांची माहिती घेणार आहोत जी तुम्हाला ॲसिडिटीच्या त्रासापासून ताबडतोब आराम मिळवून देऊ शकतात.
या पदार्थांचे सेवन तुम्हाला मिळवून देईल ऍसिडिटी पासून आराम
1- केळी– केळी हे ऍसिडिटीवर एक पटकन आराम मिळवून देण्यासाठी रामबाण ठरते. केळीमध्ये नैसर्गिक अँटासिड गुणधर्म असतात व पोटातील ऍसिडसीडचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात.
केळी खाल्ल्यामुळे पोटात थंडावा येतो आणि ऍसिडिटीमुळे होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच केळीमध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया देखील सुधारते व ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. त्यामुळे केळीचे सेवन ऍसिडिटीवर एक उत्तम उपाय आहे.
2- आल्याचा रस– आले हे औषधी गुणधर्मांनी युक्त आहे व यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म पोटातील ऍसिडसीडीटी कमी करण्यासाठी मदत करते.
आल्याचा रस किंवा आले जर तुम्ही पाण्यात उकळून त्याचे सेवन केले तर ऍसिडिटीच्या त्रासापासून पटकन आराम मिळतो. इतकेच नाहीतर पोटातील गॅस्ट्रिक सेक्रेशन कमी होऊन पोटातील जळजळ आणि वेदना देखील कमी होतात.
3- दही– पोटासाठी हे अत्यंत फायद्याचे असे अन्न असून दहीमध्ये प्रोबायोटिक्स असल्याने पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवण्यासाठी ते मदत करते आणि पचनक्रिया देखील सुधारते.
दही हे पोटातील ऍसिडसीडचे प्रमाण कमी करते आणि ऍसिडिटीच्या त्रासापासून पटकन आराम मिळतो. दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असल्यामुळे पोटात थंडावा येतो आणि पोटातील जळजळ कमी होते व पचनक्रियेला देखील चालना मिळते.ऍसिडिटीच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी दह्याची खूप मोठी मदत होते.
4- नारळाचे पाणी– नारळपाणी देखील ऍसिडिटीवर एक रामबाण उपाय आहे. शरीरामधील इलेक्ट्रोलाईटचे संतुलन राखण्यास नारळाचे पाणी खूप मोठी मदत करते आणि पोटातील ॲसिडसीडचे प्रमाण देखील कमी करते.
पोटातील जळजळ कमी करण्याकरिता व पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील नारळ पाणी फायद्याचे आहे. नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि ऍसिडिटी पासून आराम मिळतो.