गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ बँका देताय सर्वात स्वस्त होम लोन, व्याजदर कमी आणि प्रोसेसिंग चार्जवरही मिळतेय सूट

Ajay Patil
Published:
home loan

Home Loan : प्रत्येकाचं आपलं स्वतःचं, हक्काचं घर असावं असे एक स्वप्न असतं. मात्र प्रत्येकालाच हे स्वप्न पूर्ण करताना अडचणी येतात. सर्वात मोठी अडचण असते ती पैशांची. प्रत्येकाची एवढी सेविंग नसते की ते एकरकमी घर खरेदी करू शकतात किंवा तयार करू शकतात.

अशा परिस्थितीत अनेकजण घरासाठी कर्ज काढण्याचा विचार करतात. मात्र होम लोन घेण्यापूर्वी त्यावर आकारल्या जाणाऱ्या व्याजदराची आणि प्रोसेसिंग फी ची माहिती असणे जरुरीचे आहे.

जिथे कमी व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध होते त्याच बँकेतून गृह कर्ज घेणे परवडते. यामुळे आज आपण कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देणाऱ्या बँकेची यादी जाणून घेणार आहोत.

या बँका देतात कमी व्याजदरात होम लोन

स्टेट बँक ऑफ इंडिया :- स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून नावारूपाला आली आहे. SBI आपल्या ग्राहकांना कायमच वेगवेगळ्या सवलती देण्यासाठी विशेष ओळखली जाते. दरम्यान एसबीआय कमी व्याज दरात आपल्या ग्राहकांसाठी होम लोन उपलब्ध करून देते. ही बँक केवळ 8.85 टक्के व्याज दराने होम लोन देतेय. विशेष म्हणजे होम लोन साठी एसबीआयकडून 0.35 टक्के इतकीच प्रोसेसिंग फिस आकारली जाते.

एचडीएफसी बँक :- स्टेट बँक सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक तर एचडीएफसी बँक ही प्रायव्हेट सेक्टरची सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. HDFC बँकही आपल्या ग्राहकांसाठी कायमचं नवनवीन ऑफर आणि सवलती उपलब्ध करून देते. ही बँक 8.60 टक्के व्याज दरात होम लोन देत आहे. यामध्ये फक्त 0.5 टक्के किंवा 3,000 रुपये यापैकी जे जास्त असेल तेवढी प्रोसेसिंग फिस मात्र द्यावी लागते. निश्चितच एचडीएफसी बँकेचे होम लोन देखील गृह कर्ज घेणाऱ्या व्यक्तींच्या हिताचे ठरू शकते.

बँक ऑफ बडोदा :- ही देखील देशातील एक महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. ही बँक देखील आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देण्याचा दावा करते. बँक ऑफ बडोदा 8.50% व्याज दराने होम लोन उपलब्ध करून देत आहे.

पंजाब नॅशनल बँक :- ही बँक देखील आपल्या ग्राहकांसाठी कमी व्याज दरात होम लोन पुरवण्याचा दावा करते. या बँकेच्या माध्यमातून 8.55% व्याजदराने होम लोन उपलब्ध होत आहे. या बँकेकडून होम लोनच्या कर्जावर 0.35% किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये इतके प्रोसेसिंग चार्जेस आकारले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe