तुम्ही विकत घेत असलेला गूळ सेंद्रिय आहे की नाही कसे ओळखाल ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या भेसळ हा एक खूप गंभीर प्रश्न असून दूध तसेच इतर महत्त्वाच्या खाद्यपदार्थांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक पदार्थांची भेसळ केली जाते. अशी भेसळयुक्त अन्नपदार्थ जर खाल्ले तर आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते.

तसेच ही भेसळ अशा पद्धतीची केली असते की ती ओळखणे देखील कठीण होऊन जाते. तसेच दुसरे महत्त्वाची बाब म्हणजे आताचे नागरिक हे आरोग्याच्या बाबतीत खूप सजग झाले असून जास्तीत जास्त प्रमाणात रासायनिक मुक्त अन्नपदार्थांचा आहारात वापर करण्याकडे सगळ्यांचा कल दिसून येतो.

या दृष्टिकोनातून सेंद्रीय पद्धतीने पिकवलेले किंवा सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढताना दिसून येत आहे. परंतु बऱ्याचदा सेंद्रिय उत्पादनांच्या नावाखाली रासायनिक युक्त खाद्यपदार्थ देखील विकले जातात.

त्यामुळे आपल्याला अस्सल सेंद्रिय पदार्थ ओळखता येणे खूप गरजेचे आहे. या अनुषंगाने जर आपण गुळाचा विचार केला तर दैनंदिन वापरामध्ये गुळाचा वापर वाढत असून यामध्ये सेंद्रिय गुळ हा आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे.

परंतु यामध्ये रसायनयुक्त गुळ आणि सेंद्रिय गुळ कसा ओळखावा हा देखील एक मोठा प्रश्न आहे. कारण भेसळयुक्त गुळाचे सेवन केले तर त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता असते.

सेंद्रिय गुळ कसा ओळखावा?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रसायनमुक्त गुळाचा रंग हा डार्क ब्राऊन असतो. या व्यतिरिक्त जर गुळाचा रंग फिकट पांढरा किंवा पिवळा असेल तर तो रसायन मिश्रित म्हणजेच केमिकल असलेल्या गुळ आहे असे समजावा.

पांढरा किंवा लाईट ब्राऊन गुळामध्ये केमिकल अथवा रंगांचा वापर केलेला असू शकतो व त्यामुळे तो गूळ दिसायला देखील आकर्षक वाटतो. गुळामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट चा देखील वापर होण्याची शक्यता असते.

यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचा वापर हा गुळाचे वजन वाढवण्यासाठी केला जातो. तर गुळ आकर्षक व चमकदार दिसावा याकरिता सोडियम बायकार्बोनेट वापरले जाते असे देखील या क्षेत्रातील तज्ञ म्हणतात.परंतु तुम्ही काही सोप्या टिप्स वापरून सेंद्रिय गुळ ओळखू शकतात व त्या पुढील प्रमाणे….

1- साधारणपणे चांगल्या प्रतीच्या गुळाला तपकिरी रंग असतो व तो शेवटी थोडा कडवट लागतो.

2- जेव्हा तुम्ही गुळ विकत घ्याल तेव्हा त्याची पारख करता यावी याकरिता तुम्ही त्यातील एक तुकडा खावा व खाताना तो गुळ फक्त गोड लागला तर तो ठीक आहे असे समजावे.

3- गुळ जर खारट लागत असेल तर समजून घ्या की गुळामध्ये केमिकल चे प्रमाण जास्त आहे.

4- जर गुळाची चव घेताना जर त्याची चव कडवट किंवा कडू असेल तर याचा अर्थ असा होतो की उकळण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यात कारमेलिझेशन झाले आहे.

5- गुळ शुद्ध आहे की नाही हे तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर त्याकरिता त्यामध्ये कोणता क्रिस्टलचा वापर केला आहे हे तपासणे गरजेचे आहे. क्रिस्टल वरून तुम्हाला समजते की गुळाची चव गोड करण्यासाठी तो अनेक प्रक्रियातून गेला आहे.

6- गूळ जितका कठीण तितकी त्याच्या शुद्धतेची हमी असते. कठीण गुळावरून सिद्ध होते की ऊस उकळताना त्यामध्ये कोणतेही एडीटिव्ह वापरले गेलेले नाहीत.

अशाप्रकारे तुम्ही या साध्या सोप्या गोष्टी पाहून गुळाची शुद्धता ओळखू शकतात.