सोन्याची खरेदी करताना शुद्ध सोने कसे ओळखाल? सोने खरेदी करण्याअगोदर ‘या’ गोष्टी बघा

कुठल्याही सणासुदीचा कालावधी असो किंवा लग्नसराई यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्याची परंपरा भारतामध्ये आपल्याला दिसून येते. असे सणासुदीच्या कालावधीमध्ये सोने खरेदी ही अत्यंत शुभ मानली जाते. तसेच गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देखील बरेच व्यक्ती हे सोन्याची खरेदी करतात.

Ajay Patil
Published:
pure gold

Tips For Identify Pure Gold:- कुठल्याही सणासुदीचा कालावधी असो किंवा लग्नसराई यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्याची परंपरा भारतामध्ये आपल्याला दिसून येते. असे सणासुदीच्या कालावधीमध्ये सोने खरेदी ही अत्यंत शुभ मानली जाते. तसेच गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देखील बरेच व्यक्ती हे सोन्याची खरेदी करतात.

सध्या जर आपण सोन्याचे दर पाहिले तर ते कधी नव्हे एवढ्या उच्चांकी पातळीवर आहेत. परंतु तरीदेखील मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.

परंतु लाखो रुपये देऊन सोने खरेदी करताना सोन्याची शुद्धता तपासणे देखील गरजेचे असते. परंतु आपल्याला प्रश्न पडतो की नेमकी सोन्याची शुद्धता कशी तपासली जाऊ शकते किंवा शुद्ध सोने कशा पद्धतीने ओळखणे शक्य आहे? याबद्दलचीच माहिती आपण या लेखात थोडक्यात बघू.

या गोष्टी तपासा आणि सोन्याची शुद्धता ओळखा

1- बीआयएस स्टॅंडर्ड मार्क बघणे- हे जे काही चिन्ह असते ते त्रिकोणी आकारांमध्ये असते. ज्याच्या खाली बीआयएस(BIS)असे लिहिलेले असते. हे जे काही चिन्ह असते ते सोन्याच्या शुद्धतेचा सर्वात मोठा पुरावा असते.

याद्वारे असे सुचित होते की,सोन्याची बीआयएस मान्यता प्राप्त प्रयोगशाळेमध्ये चाचणी केली गेली आहे व ते निर्धारित शुद्धता मानकांची पूर्तता करते. त्यामुळे सोने खरेदी करताना बीआयएस मार्क बघून सोने खरेदी करावे.

2- एचयुआयडी क्रमांक बघणे- यालाच युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असे म्हणतात व हा जो काही हॉलमार्क क्रमांक असतो तो सर्व हॉलमार्क सोन्यावर असतो.

या क्रमांकाच्या माध्यमातून दागिन्याचे उत्पादक आणि हॉलमार्किंग केंद्राचा मागोवा घेण्यास मदत मिळते. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करणे अगोदर त्यावरील एचयुआयडी क्रमांक नक्की बघावा.

3- शुद्धता ग्रेड बघणे- ही एक महत्त्वाची खूण असून जी कॅरेट आणि अंकांमध्ये दाखवलेली असते. यामध्ये जर बघितले तर 22k(916)- 91.6 टक्के शुद्ध सोने असा त्याचा अर्थ होतो.
18K(750)- याचा अर्थ 75% शुद्ध सोने असा होतो.
14K (585)- याचा अर्थ 58.5% शुद्ध सोने असा होतो.

4- ज्वेलर्स आयडेंटिफिकेशन आणि हॉलमार्किंग सेंटरचा लोगो पाहणे- यासोबतच सोन्याच्या दागिन्यांवर ज्वेलर्सची ओळख आणि हॉलमार्किंग सेंटरचा लोगो असणे देखील गरजेचे आहे. जे ज्वेलर्स बीआयएस प्रमाणित असतात त्यांची एक वेगळी ओळख असते व ती ओळख दागिन्यांवर छापलेली असते. तसेच या सोबतच हॉलमार्किंग सेंटरचा लोगो देखील असावा. हा लोगो सूचित करतो की दागिन्यांची शुद्धतेसाठी मान्यताप्राप्त केंद्रांवर चाचणी करण्यात आलेली आहे.

5- मोबाईल ॲपच्या मदतीने चाचणी करणे- सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनचा देखील वापर करू शकतात व याकरिता तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर किंवा एप्पल ॲप स्टोअर वरून बीआयएस केअर एप्लीकेशन सर्वप्रथम डाऊनलोड करावे लागेल.

हे ॲप्लिकेशन भारतीय मानक ब्युरोच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले आहे व याच्या मदतीने सोने आणि चांदीसह इतर अनेक उत्पादनांची गुणवत्ता आणि त्यांची वैधता तपासता येणे शक्य आहे. हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर या ॲपच्या होम पेजवर जावे आणि त्या ठिकाणी व्हेरिफाय HUID या पर्यायावर क्लिक करावे.

त्यानंतर दागिन्यांवर जो काही सहा अंकी एचयूआयडी क्रमांक असतो तो टाकावा. जर दागिने शुद्ध किंवा खरे असतील तर हे ॲप्लिकेशन दागिन्यांची शुद्धता तसेच उत्पादनाचे नाव यासारखी माहिती दाखवते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe