ICMR Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आय सी एम आर अर्थातच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती काढण्यात आली आहे.
ही भरती आयसीएमआरच्या वृद्धत्व आणि मानसिक आरोग्य केंद्रात होणार आहे. टेक्निकल असिस्टंट आणि फिल्ड वर्कर या पदाच्या रिक्त जागा याच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या जागांची भरती थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
म्हणजे उमेदवाराची निवड ही मुलाखतीने केली जाणार असून यासाठी लेखी परीक्षा राहणार नाही. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक ती माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- अमेरिकन व्यक्तीच भारतीय शेतकऱ्यांसाठी भन्नाट संशोधन; तयार केला मायक्रो सोलर पंप, कसा होतोय शेतकऱ्यांचा फायदा? पहा…
कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती?
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वृद्धत्व आणि मानसिक आरोग्य केंद्रात टेक्निकल असिस्टंट आणि फिल्ड वर्कर या दोन पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती रिक्त जागांसाठी होणार भरती
टेक्निकल असिस्टंट पदाची एक रिक्त जागा आणि फिल्ड वर्कर या पदाची एक रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार असल्याचे आयसीएमआरच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. अर्थातच या भरतीच्या माध्यमातून दोन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
हे पण वाचा :- मुंबई, गोवा, कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी सुरु होणार Mumbai-Goa वंदे भारत एक्सप्रेस, पहा….
आवश्यक शैक्षणिक पात्रता
अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, टेक्निकल असिस्टंट या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार सायन्स फॅकल्टी मधील पदवीधर आणि संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव किंवा पदव्यूत्तर पदवीधर यासाठी पात्र राहणार आहेत. संबंधित क्षेत्रातील अनुभवासह पर्यावरण विज्ञान/ रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय फिल्ड वर्कर या पदासाठी 12 वी उत्तीर्ण आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनचा दोन वर्षांचा डिप्लोमा केलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. किंवा एका वर्षाचा डीएमएलटीचा कोर्स पूर्ण केलेले उमेदवार, सोबतच एक वर्ष कामाचा अनुभव असलेले उमेदवार यासाठी पात्र राहतील.
किंवा विज्ञान विषयात https://li24.in/imee0 12वी उत्तीर्ण उमेदवार आणि फिल्ड/ लॅबोरेटरीत दोन वर्ष कामाचा अनुभव असलेले उमेदवार यासाठी पात्र राहणार आहेत. बीएससी पदवी आणि संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव असल्यास उमेदवाराला प्राधान्य दिले जाणार आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी तीस वर्षापेक्षा अधिक वयाचे उमेदवार पात्र राहणार नाहीत.
वेतन किती मिळणार?
फिल्ड वर्कर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 रुपये + एचआरए 4860 रुपये असे वेतन दिले जाणार आहे. याशिवाय टेक्निकल असिस्टंट या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 20,000 रुपये + एचआरए 5400 रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.
मुलाखत केव्हा होणार?
थेट मुलाखतीच्या माध्यमातून या पदासाठी उमेदवाराची निवड होणार असून मुलाखत प्रक्रिया दोन जून 2023 रोजी आयसीएमआर सीएएम कोलकता येथे आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीच्या वेळी आवश्यक डॉक्युमेंट्स उमेदवाराने घेऊन जाणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनला कोकणातील ‘या’ महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावरही थांबा मिळणार? पहा….