World Cup 2023 चा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणता संघ विजेता होईल ? आयसीसीने नियम सांगितले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

World Cup 2023 :- मंगळवारी आयसीसीने एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेला ५ ऑक्टोबरला सुरुवात होणार असून अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये खेळले जाणारे 9 सामने वेगवेगळ्या ठिकाणी खेळणार आहे. भारत या मेगा टूर्नामेंटचे यजमानपद भूषवणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 10 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवू शकेल, अशी अपेक्षा आहे.

अंतिम आणि उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्पर्धेचा सलामीचा सामना आणि अंतिम सामना होणार आहे. भारतात होणाऱ्या 13व्या वनडे विश्वचषकाचा पहिला सामना 2019 चा चॅम्पियन संघ इंग्लंड आणि अंतिम फेरीतील उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या क्षमतेमुळे हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, या स्टेडियमची एकूण क्षमता एक लाख तीस हजार प्रेक्षक आहे.

अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणता संघ विजेता
आता जर तुम्हाला प्रश्न पडला कि World Cup 2023 चा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणता संघ विजेता होईल?तर त्याचे उत्तर आहे असे होणारच नाही कारण फायनल साठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. समजा फायनलच्या दिवशी पाऊस आलाच तर ती लढत दुसर्या दिवशी – म्हणजेच राखीव दिवशी मॅच होईल आणि World Cup 2023 चा विजेता सामन्यात ठरेल.

असे आहे राखीव दिवस
स्पर्धेतील बाद फेरीचे वेळापत्रक पाहिल्यास, आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, तर दुसरा उपांत्य सामना कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर दुसऱ्याच दिवशी खेळला जाईल.

याशिवाय, 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजेतेपदाचा सामना खेळला जाईल, ज्यासाठी आयसीसीने पुढील दिवस 20 नोव्हेंबर राखीव दिवस म्हणून ठरवला आहे.

एकूण 10 संघ सहभागी होणार
विशेष म्हणजे 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. यासाठी 8 संघ थेट पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. आता उर्वरित 2 संघांचा निर्णय होणे बाकी आहे. यासाठी क्वालिफायर फेरी खेळली जाईल.

क्वालिफायरची लढाई सुरूच आहे
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या पात्रता फेरीच्या गुण सारणीनुसार, झिम्बाब्वे, नेदरलँड्स आणि वेस्ट इंडिज हे गट-अ मधील सुपर 6 मध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत. ब गटातील श्रीलंका, स्कॉटलंड आणि ओमान पुढील टप्प्यात पोहोचणे जवळपास निश्चित आहे. त्याचबरोबर नेपाळ, अमेरिका, यूएई आणि आयर्लंड या देशांना पुढे जाता येणार नाही. यंदाचे विश्वचषक खेळण्याचे त्याचे स्वप्न भंगले आहे.