EPFO Change Rule: पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाला तर आता नॉमिनीला मिळतील तात्काळ पैसे; ईपीएफओने घेतला महत्त्वाचा निर्णय

Ajay Patil
Published:
epfo change rule

 

EPFO Change Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे देशामध्ये कोट्यावधी सदस्य असून या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खात्यांचे नियमन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओवर आहे. त्यामुळे याबद्दलचे सर्व निर्णय घेण्याच्या अधिकार देखील या संघटनेलाच आहे.

अशाच प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने घेतला असून त्यानुसार आता पीएफ खातेधारकाचा मृत्यू दाव्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला असून अगोदर नॉमिनी ला पैसे मिळण्यामध्ये जो त्रास किंवा वेळ लागत होता तो आता लागणार नाही.

 पीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला मिळतील ताबडतोब पैसे

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक महत्त्वाचा व मोठा निर्णय घेतला असून त्या निर्णयानुसार आता पीएफ खातेधारकाच्या मृत्यू दाव्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासंबंधीची माहिती ईपीएफओने परिपत्रक जारी करून दिली आहे.

पीएफ खातेदारकाचा जर मृत्यू झाला तर त्यानंतर त्याच्या खात्यामधील पैसे नॉमिनी किंवा ज्या व्यक्तीला द्यायचे आहेत त्या व्यक्तीची ओळख पटवणे थोडे अवघड होते व या पार्श्वभूमीवरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 काय आहे नेमका निर्णय?

बरेचदा आपण पाहतो की आधार कार्ड हे पीएफ खात्याची लिंक नसते किंवा आधार कार्ड वरील माहिती आणि पीएफ खात्याची माहिती यामध्ये तफावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे साहजिकच पीएफ खातेदारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला पैसे मिळण्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात.

परंतु आता या नवीन निर्णयानुसार पाहिले तर जरी माहिती अर्धवट असेल तरी आता पीएफ खातेदाराचे पैसे त्याच्या वारसाला दिले जाणार आहेत त्यामुळे आता मृत्यूचा दावा सेटलमेंट करणे खूप सोपे होणार आहे. एखाद्या व्यक्तीची दिलेल्या माहितीमध्ये काही चुका झाल्या असतील किंवा तांत्रिक कारणामुळे आधार कार्डच डी ऍक्टिव्ह असेल तर दावा करताना अडचणी येत होत्या.

यामुळे पीएफ खातेधारकाच्या वारसाला माहितीची पडताळणी करताना देखील अनेक अडथळे येत होते त्यामुळे साहजिकच पैसे मिळण्याला खूप वेळ लागत होता. त्यामुळे आता हा निर्णय त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हटले आहे की, पीएफ खातेदारकाचा जर मृत्यू झाला तर त्याच्या आधार कार्ड मधील माहिती दुरुस्त करता येत नाही.

त्यामुळे भौतिक गोष्टींच्या आधारावर पडताळणी केली जाते व त्या आधारावरच नॉमिनीला  पैसे दिले जातात. यासाठी मात्र प्रादेशिक अधिकाऱ्यांची मान्यता खूप आवश्यक असते. जोपर्यंत यावर प्रादेशिक अधिकाऱ्यांचा शिक्का असत नाही तोपर्यंत संबंधित नॉमिनीला पैसे मिळणे शक्य नसते व यामुळे कोणतेही फसवणूक होऊ नये याकरिता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने विशेष काळजी देखील घेतली आहे.

आता या नवीन नियमानुसार बघितले तर पीएफ खातेदारकाचा जो नॉमिनी असेल त्या व्यक्तीची चौकशी केली जाईल व त्यानंतर त्यांना पैसे दिले जातील. परंतु यामध्ये लक्षात घेण्यासारखे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नियम तेव्हाच लागू होईल जेव्हा खातेधारकाच्या आधार कार्डमध्ये चुका असतील. तसेच पीएफ खातेधारकांनी जर नॉमिनी म्हणून नावचं दिले नसेल तर संबंधित खातेधारकाच्या पीएफचे पैसे त्या मृत झालेल्या खातेदाराच्या कायदेशीर वारसाला दिले जातात.