Monsoon Trip: पावसाळ्यात गोव्याला जा फिरायला पण नुसते बीच नाहीतर पहा ‘ही’ ठिकाणे! तरच होईल गोव्याची ट्रिप पूर्ण

Ajay Patil
Published:
dudhsagar falls

Monsoon Trip:- आता पावसाला सुरुवात झाली असून या ऋतूमध्ये निसर्ग मुक्त हस्ताने उधळण करत असतो व सगळीकडे हिरवीगार दृश्य आपल्याला दिसून येतात व सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिमझिम पडणाऱ्या पावसात डोंगरदऱ्या तसेच एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा असतो.

त्यामुळे पावसाळ्यामध्ये बरेचजण अनेक ठिकाणी जाण्यासाठी ट्रीप प्लान करतात. अशा पद्धतीने ट्रिप प्लॅन करताना ती कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत केली जाते.या ट्रिपमध्ये बरेच व्यक्ती हे गोव्याला जाण्याचे प्लॅनिंग करतात. आता गोवा म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्या डोळ्यासमोर येतो तो समुद्रकिनारा आणि त्या ठिकाणी असणारी बीच होय.

या ठिकाणाचे बीच हे गोव्याचे पर्यटनाचे खास आकर्षण असून त्या ठिकाणी उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन दररोजच्या जीवनातील चिंता आणि तणाव विसरून काही क्षण आरामात आणि मजेत घालवण्यात वेगळाच आनंद असतो. पण गोव्याला फिरायला जाणे म्हणजे नुसते बीच पाहणे असे नव्हे.

कारण गोव्यामध्ये अशी अनेक पर्यटन स्थळे किंवा महत्त्वाचे ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात नक्कीच भेट देणे गरजेचे आहे. कारण गोव्याला निसर्गाने भरपूर असे दिले असून याशिवाय या ठिकाणी असलेल्या वास्तुकला तसेच मसाल्यांच्या बागा देखील महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे तुम्हाला जर या पावसाळ्यात गोवा फिरायला जायचे असेल तर तुम्ही गोव्यातील बीच व्यतिरिक्त अनेक ठिकाणी पाहू शकतात.

 गोव्यातील ही ठिकाणे आहेत महत्त्वपूर्ण

1- कातळ शिल्प बऱ्याच लोकांना ऐतिहासिक गोष्टी पाहायला खूप मोठ्या प्रमाणावर आवडतात व गोव्यात देखील असा ऐतिहासिक समृद्ध खजिना तुम्हाला उपलब्ध आहे. गोव्यामध्ये अनेक पठारांवर कातळ शिल्प तुम्ही पाहू शकतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर गोव्यातील रिओना येथील कुशावती नदीच्या काठी असलेले उसगलीमल हे असेच एक  महत्त्वाचे ठिकाण आहे.

2- अर्वालेम गुहा गोव्यामध्ये समुद्रकिनाऱ्याव्यतिरिक्त अनेक ऐतिहासिक ठिकाणे देखील आहेत व त्यांना पुराणांचा देखील आधार आहे. महाभारत काळातील गुहा तुम्हाला गोव्यात पाहायला मिळतात. असे म्हटले जाते की पांडव हे द्रोपती सोबत गोव्याला आले होते.

त्यातील जर आपण  अर्वालेम गुहा किंवा लेणी पाहिली तर ते उत्तर गोव्यातील संकलिम या गावात असून पांडव त्यांच्या वनवासाच्या कालावधीमध्ये या लेण्यांमध्ये राहत होते असे म्हटले जाते. यासंबंधीचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसला तरी स्थानिक लोकांचा यासंबंधी विश्वास आहे. तसेच या गुहा सातव्या शतकात बांधला गेल्याचे इतिहासकारांचे मत आहे.

3- दूधसागर धबधबा गोव्यामध्ये जे काही पर्यटन स्थळे आहेत त्यापैकी दूध सागर धबधबा हा एक महत्त्वाचा धबधबा असून पर्यटनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी भेट देतात. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा वर्षभर वाहत असतो. दूध सागर धबधबा कर्नाटक आणि गोवा बॉर्डरवर असून तो 130 मीटर उंचीवरून पडतो व मांडवी नदीने तयार झालेला हा धबधबा असून त्याचे पाणी दुधासारखे आहे.

4- अंथन डॅम तुम्हाला जर दररोजच्या गोंगाटापासून एखाद्या शांत ठिकाणी जायचे असेल तर तुमच्यासाठी अंथन डॅम हे ठिकाण खूप महत्त्वपूर्ण ठरते. तुम्हाला जर फोटोग्राफी किंवा पक्षी निरीक्षणाचा छंद असेल तर अंथन डॅम हे ठिकाण तुमच्यासाठी नंदनवनच आहे. हे ठिकाण अतिशय सुंदर आहेस परंतु शांत देखील आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe