इलेक्ट्रिक वाहनांचा वापराचा ट्रेंड आता वाढताना दिसून येत असून यामध्ये इलेक्ट्रिक कार पासून तर इलेक्ट्रिक दुचाकी व इलेक्ट्रिक स्कूटर यांचे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून खरेदी केली जात असून विविध वाहन उत्पादक कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे वळल्याचे चित्र आहे.
कारण पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर खूप फायद्याचा ठरेल व करताच केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरायला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जर आपण ग्राहकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु जेव्हा आपण कुठलेही वाहन खरेदी करतो तेव्हा आपण काही गोष्टींचा विचार करूनच ते खरेदी करतो व हीच बाब इलेक्ट्रिक स्कूटर च्या खरेदीवर देखील लागू होते.
त्यामुळे तुम्हाला देखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्ही काही मुद्दे किंवा प्रश्न विक्रेत्याला जरूर विचारणे गरजेचे आहे. कारण बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे फीचर्स तसेच रेंज असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत.यापैकी नेमकी तुम्हाला कोणत्या प्रकारची इलेक्ट्रिक स्कूटरची गरज आहे किंवा तुमच्या गरजेनुसार कोणती इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी योग्य राहील याची निवड करणे खूप गरजेचे आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करा परंतु हे प्रश्न विक्रेत्याला विचारा
1- तुम्ही घेत असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची श्रेणी आणि बॅटरीची क्षमता– इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाबतीत त्या स्कूटरची श्रेणी आणि बॅटरीची क्षमता या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. समजा तुम्हाला जर हायवे वर इ स्कूटर चालवायचे असेल तर त्या स्कूटरची रेंज जास्त असणे गरजेचे आहे.
तसेच बॅटरीची क्षमता देखील चांगली असेल तर पुन्हा पुन्हा तुम्हाला चार्जिंग करण्याचा त्रास होणार नाही. जवळपासचा प्रवास असेल तर कमी श्रेणीची इलेक्ट्रिक स्कूटर योग्य असते. परंतु तुमचा प्रवास किंवा वापर जर जास्त असेल तर कमीत कमी तुम्हाला शंभर किलोमीटर पेक्षा जास्तीची रेंज असलेली स्कूटर खरेदी करणे फायद्याचे ठरते.
2- स्कूटर चार्जिंगची वेळ– एखादी इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग करायला जर जास्त कालावधी लागत असेल तर ते फायद्यापेक्षा बऱ्याचदा नुकसानीचे ठरू शकते. कारण जर स्कूटरमध्ये फास्ट चार्जिंग होण्यासाठीची आवश्यक सुविधा नसेल तर बॅटरी चार्ज करायला खूप वेळ लागतो
व अशा परिस्थितीमध्ये अनेक कामे हातातून जाऊ शकतात. आता अशा अनेक इलेक्ट्रिक स्कूटर आले आहेत ज्यांची बॅटरी काही मिनिटांमध्ये 50 ते 60 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.
3- बॅटरी आणि मोटरची वारंटी– इलेक्ट्रिक स्कूटर किंवा इलेक्ट्रिक वाहनातील सर्वात महागडा पार्ट कोणता असेल तर तो म्हणजे त्या वाहनाची बॅटरी होय. तेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायला जाल तेव्हा संबंधित डीलरला इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची वारंटी बद्दल नक्की विचारणे गरजेचे असून
जर वारंटी कालावधीमध्ये बॅटरी किंवा मोटर खराब झाली तर कंपनी स्वतःच्या खर्चाने ती बदलेल की नाही हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही घेत असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला जी काही वारंटी दिली जात आहे त्यामध्ये कोणकोणते भाग समाविष्ट आहेत हे देखील विचारून घेणे गरजेचे आहे.
4- बॅटरीचे आयपी रेटिंग तपासणे– बॅटरीची आयपी रेटिंग ही खूप महत्त्वाची असून बॅटरी पाणी आणि धूळ यांचा किती प्रतिकार करू शकते याची क्षमता दाखवत असते. जर आपण आज काल बऱ्याच कंपन्या पाहिल्या तर त्या आयपीएस 67 रेटिंग असलेल्या बॅटरी वापरत आहेत व या रेटिंग सह बॅटरी पाणी आणि धूळ पासून संरक्षण ठेवते. जर संबंधित कंपनीने बॅटरीचे आयपी रेटिंग उघड करण्यास किंवा सांगण्यास नकार दिला तर ती स्कूटर खरेदी करू नये.
5- इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड पाहणे– महामार्गावर प्रवास करताना तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा वेग हा खूप महत्त्वाचा असतो. कारण तुम्ही जेव्हा महामार्गावर इलेक्ट्रिक स्कूटर चालवाल तेव्हा तिचा वेग उत्तम असणे गरजेचे आहे. साधारणपणे इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 70 ते 83 किलोमीटर प्रतितास असेल तर हायवेवर स्कूटर चालवणे व्यवस्थित व सोपे जाते.